Farming News : महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, कांदा या नगदी पिकांसोबतच डाळिंब आणि द्राक्ष या फळबाग पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. विशेषता राज्यात द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.
महाराष्ट्रातील पश्चिम भागात प्रामुख्याने द्राक्ष लागवड पाहायला मिळते. यामध्ये नाशिक जिल्ह्यात द्राक्ष लागवड विशेष उल्लेखनीय आहे. जिल्ह्यातील एकूण द्राक्ष उत्पादन पाहता जिल्ह्याला द्राक्षाचे आगार म्हणून ओळखले जाते तर नाशिक शहर वाईन सिटी म्हणून संपूर्ण जगात ख्यातीप्राप्त आहे.

यासोबतच, सांगली जिल्हा देखील द्राक्ष उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. शिवाय यंदा जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादन वाढलं आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा द्राक्ष पिकासाठी हवामान पोषक असल्यामुळे उत्पादनात भरीव वाढ झाली. सोबतच एकाच वेळी अनेकांनी छाटणी केल्याने द्राक्ष हार्वेस्टिंग एकाच वेळी आली.
हे पण वाचा :- बारावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! या बँकेत निघाली मोठी भरती, आजच ‘या’ इमेलवर पाठवा आपला अर्ज
परिणामी बाजारात द्राक्षाचा पुरवठा एकाच वेळी अधिक झाला. या अशा परिस्थितीत द्राक्षाला अपेक्षित असा भाव मिळाला नाही, यामुळे राज्यातील अनेक द्राक्ष बागायतारांनी बेदाणा निर्मितीकडे आपला मोर्चा वळवला. सांगली जिल्ह्यातही अनेक शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मिती केली आहे.
मात्र, आता हे बेदाणा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यात यंदा तब्बल 28 हजार टन बेदाणा निर्मिती करण्यात आला आहे. म्हणजे गेल्या हंगामाच्या तुलनेत यामध्ये दहा हजार टनांची भर पडली आहे.
मात्र बेदाण्याला मात्र 70 ते 120 रुपये प्रति किलो एवढाच भाव सध्या मिळत आहे. बेदाण्याचे वाढलेले उत्पादन आणि बाजारात असलेली कमी मागणी यामुळे बेदाण्याला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याचे सांगितलं जात आहे.
हे पण वाचा :- खुशखबर ! अंगणवाडी सेविकांना ‘या’ महिन्याच्या वेतनासोबत मिळणार वाढीव मानधनाचा लाभ, राज्य सरकारचा मोठा निर्णय
दरात घसरण होण्याचे मुख्य कारण काय?
प्रमुख द्राक्ष उत्पादक जिल्ह्यामध्ये बेदाण्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, यंदा अरब आणि गल्फ देशांमध्ये देखील बेदाणा उत्पादन वाढले आहे. परिणामी तेथून बेदाण्याला अपेक्षित मागणी नाही.
त्यामुळे बेदाण्याच्या दरात घसरण झाली असून देशांतर्गत 50 ते 80 रुपयांपर्यंतची प्रति किलो मागे घसरण नमूद करण्यात आली आहे. यामुळे बेदाणा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
एकंदरीत द्राक्षाला अपेक्षित असा भाव मिळाला नसल्याने द्राक्ष उत्पादकांनी बेदाणा तयार करण्याचा निर्णय घेतला आणि आता हा देखील निर्णय शेतकऱ्यांच्या अंगलट आला असल्याचे चित्र आहे.
उत्पादन खर्च पण निघेना
शेतकरी सांगतात की, द्राक्ष उत्पादित करण्यासाठी एकरी दिड लाखाचा खर्च येतो. तसेच बेदाणा उत्पादित करण्यासाठी एकरी एक लाख वीस हजार पर्यंतचा खर्च येतो.
म्हणजे बेदाणा तयार करण्यासाठी एकरी पावणेतीन लाख रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. अशा परिस्थितीत सध्या मिळत असलेल्या दरात उत्पादन खर्च देखील भरून निघणार नाही असं शेतकरी सांगत आहेत.
हे पण वाचा :- मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसनंतर महाराष्ट्रातील ‘या’ महत्वाच्या मार्गांवरही सुरु होणार Vande Bharat Train, वाचा….