Tur Farming : खरीपात तुरीच्या ‘या’ वाणाची पेरणी करा; 20 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणार !

Ajay Patil
Published:
Tur Farming

Tur Farming : महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये तूर या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. विदर्भात तुरीची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. विदर्भातील बहुतांशी शेतकरी बांधव तुर पिकाची शेती करतात.

विशेष म्हणजे सध्या तुरीला बाजारात 11 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा विक्रमी दर मिळत आहे. यामुळे येत्या खरीप हंगामामध्ये तूर लागवडीखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान जाणकार लोकांनी शेतकऱ्यांना तुरीच्या सुधारित जातींची पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. या परिस्थितीत आज आपण तुरीच्या काही सुधारित जातींची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसनंतर महाराष्ट्रातील ‘या’ महत्वाच्या मार्गांवरही सुरु होणार Vande Bharat Train, वाचा….

तुरीच्या सुधारित जाती खालील प्रमाणे

पी.के.व्ही. तारा :- ही तुरीची एक सुधारित जात असून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. ही जात 2013 मध्ये महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आली आहे. मर रोगासं ही जात प्रतिबंधात्मक आहे शिवाय वांझ रोगास प्रतिकारक्षम आहे. पेरणी केल्यानंतर साधारणता 180 दिवसात या जातीपासून उत्पादन मिळते. तसेच हेक्टरी 20 क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.

विपुला :- ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. मर आणि वांझ रोगास ही जात मध्यम प्रतिकारक असल्याचा दावा केला जातो. ही जात 150 ते 170 दिवसात परिपक्व बनते आणि या जातीपासून हेक्टरी 16 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. निश्चितच ही देखील जात राज्यातील तुर उत्पादकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

हे पण वाचा :- खुशखबर ! अंगणवाडी सेविकांना ‘या’ महिन्याच्या वेतनासोबत मिळणार वाढीव मानधनाचा लाभ, राज्य सरकारचा मोठा निर्णय

पी.डी.के.व्ही. आश्‍लेषा :- ही जात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अलीकडे विकसित केली आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात ही जात लागवडीसाठी योग्य आहे. ही जात या संबंधित राज्यात लागवडीसाठी 2022 मध्ये प्रसारित करण्यात आली आहे. ही जात लागवडीनंतर साधारणतः 177 ते 178 दिवसात परिपक्व बनते. या जातीपासून हेक्‍टरी 19 ते 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञ लोकांनी केला आहे. निश्चितच ही देखील जात राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

आशा (आय.सी.पी.एल. ८७११९) :- ही देखील तुरीची एक सुधारित जात आहे. ही जात साधारणता 180 ते 200 दिवसात काढण्यासाठी तयार होते. या जातीपासून हेक्‍टरी 12 ते 14 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो. साहजिकच ही जात इतर प्रगत जातीच्या तुलनेत कमी उत्पादन देते. मात्र तरीही या जातीला राज्यातील काही शेतकऱ्यांनी पसंती दाखवली आहे.

हे पण वाचा :- बारावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! या बँकेत निघाली मोठी भरती, आजच ‘या’ इमेलवर पाठवा आपला अर्ज

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe