Weather Update : मार्च आणि एप्रिल महिन्यात जरी यंदा फारसं ऊन जाणवलं नाही तरी मे महिन्यात तापमानात झालेली वाढ अंगाची पार लाहीलाही करत आहे. आता जून महिना उजाडून जवळपास चार दिवस झालेत मात्र तरीही उन्हाची तीव्रता काही कमी होण्याचे नाव घेत नाही.
अशा स्थितीत उकाड्याने हैराण झालेली सामान्य जनता आणि पेरणीची तयारी करून बसलेला बळीराजा मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मान्सून बरसणार आणि पेरणीची कामे लवकरात लवकर पूर्ण होणार, जेणेकरून रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई या येत्या खरीप हंगामातून काढता येणार अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘या’ नवविवाहित जोडप्यांना मिळणार 50 हजाराचं प्रोत्साहन अनुदान ! पण…..
दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून मान्सून संदर्भात नुकतीच एक महत्त्वाची माहिती देण्यात आली होती. हवामान विभागाने चार जून अर्थातच आज मान्सूनचे केरळात आगमन होईल अशी शक्यता वर्तवली होती. मात्र अजूनही केरळात मान्सूनचे आगमन झालेले नाही.
येत्या काही तासात आगमनाची शक्यता आहे. मात्र जर आज केरळमध्ये मान्सून आगमन झाले नाही तर यंदा मान्सूनचे केरळातील आगमन एक आठवडा पर्यंत लांबू शकत. दरम्यान, काल विदर्भातील अमरावती मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली.
अमरावतीत 43.6°c तापमान नोंदवले गेले. गोंदिया, अकोला, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, परभणी येथेही तापमान 43°c च्या आसपास होते. तर राज्यातील बहुतांशी भागात तापमान चाळीस अंश सेल्सिअस पार होते.
हे पण वाचा :- कापसाच्या पंगा आणि कबड्डी वाणाला मिळतेय शेतकऱ्यांची पसंती ! वाणाच्या विशेषता पहा….
काल राज्यातील काही भागात तुरळक पावसाच्या सऱ्या देखील बरसल्यात. आजही राज्यातील ठराविक भागात मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता असून काही जिल्ह्यात गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. IMD ने सांगितले की, आज मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यात गारपिट होण्याचा अंदाज आहे.
यामुळे संबंधित जिल्ह्यातील सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. विदर्भात मात्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भातील जनतेला देखील उन्हापासून स्वतःचे संरक्षण करायचे आहे. शेती कामे करताना शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेणे अपेक्षित आहे.
हे पण वाचा :- सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासावी ! उगवण क्षमता कशी तपासणार ? पहा….