ये रे ये रे पावसा….! मान्सून पुन्हा लांबणीवर; महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी होणार मान्सूनचे आगमन, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Published on -

Monsoon Update : राज्यातील जनता गेल्या महिन्याभरापासून उकाड्याने हैराण झाली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस झाला यामुळे उन्हाची दाहकता भासली नाही. मात्र मे महिन्याच्या चार तारखेपासून ते आत्तापर्यंत जवळपास राज्यातील सर्वच जिल्ह्यात तापमान अधिक पाहायला मिळाले आहे.

तापमान 40 अंश सेल्सिअस पार गेले आहे. यामुळे उकाडा अधिक असून आता शेतकऱ्यांसह सामान्य जनता वाट पाहत आहे ती मान्सूनची. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने यंदा 4 जूनला केरळमध्ये मान्सून येणार असं भाकीत वर्तवलं होतं.

मात्र हे भाकीत यंदा फोल ठरले आहे. मान्सूनने यंदा भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाला चकवा दिला आहे. भारतीय हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी मान्सूनच्या या परिस्थितीवर मोठे भाष्य केले आहे. 

हे पण वाचा :- अहमदनगरच्या शेतकरी पुत्रांनी विकसित केलं कांदा लागवडीचे यंत्र; शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा

कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती तयार झाली आहे. ही परिस्थिती आज अर्थात मंगळवारी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे आज दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होणार आहे.

यानंतर मग दोन दिवसात कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडून सरकून दक्षिण-पूर्व व लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात तीव्र होईल. पुढील दोन दिवसात हे दोन्ही पट्टे उत्तरेकडे सरकू शकतात. यानंतरच मग मान्सूनसाठी पोषक परिस्थिती तयार होऊ शकते असं मत ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर अनुपम यांनी यावेळी व्यक्त केल आहे.

हे पण वाचा :- खरीप हंगामात मका पिकाच्या ‘या’ जातीची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार, वाचा….

केरळमध्ये मान्सून येतो हे कसं समजत?

मान्सूनचे केरळातील म्हणजेच भारताच्या मुख्य भूमीवरील आगमन हे तेथील प्रमुख 14 केंद्रांवर पडणाऱ्या पावसावर आधारित असते. तेथील 14 केंद्रांवर जर पाऊस पडला तर मान्सूनचे केरळात आगमन झाले असे समजले जाते. मात्र सध्या स्थितीला तेथील केवळ एकाच केंद्रावर पाऊस सुरू असून उर्वरित केंद्रावर पावसाचे वातावरण असतानाही पाऊस पडत नसल्याचे सांगितले गेले आहे.

महाराष्ट्रात केव्हा होणार पावसाचे आगमन?

भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या दीर्घ कालावधीच्या अंदाजानुसार, या आठवड्याच्या अखेरपर्यंत अर्थातच दहा ते अकरा जून पर्यंत मान्सूनच केरळात आगमन होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर मग 14 ते 15 जून पर्यंत राज्यातील तळ कोकणात मान्सूनची एन्ट्री होणार असा अंदाज आहे. तसेच तेथून सहा ते सात दिवसात अर्थातच 22 ते 23 जून पर्यंत मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने या निमित्ताने स्पष्ट केले आहे. 

हे पण वाचा :- नादखुळा ! नोकरी सांभाळत सुरू केली शेती, अंजीरच्या बागेतून साधली आर्थिक प्रगती

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe