सावकाराच्या पत्नीची महिलेला मारहाण, १२ हजार रुपयांचे वसूल केले ९५ हजार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील जवळा गावात एका सावकाराने एका महिलेकडून सहा महिन्यांत मुद्दल व व्याजापोटी १२ हजार रुपयांचे त्याने ९५ हजार रुपये वसूल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान या सावकाराच्या पत्नीने सुद्धा महिलेला मारहाणही केली असून याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.महाराष्ट्रदिनी हा मारहाणीचा प्रकार घडला आहे,

महाराष्ट्र दिनी सकाळीच सावकाराच्या पत्नीने त्या महिलेच्या घरी जाऊन तिला शिवीगाळ करत मारहाण केली.सावकार महिलेकडून जिवाला धोका असल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.

या महिलेने संबंधी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तक्रारीत म्हटले, की मोलमजुरी करणाऱ्या या महिलेने ४ ऑक्टोबर २०१९ मध्ये गावातील एका खासगी सावकाराकडून १२ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.

सावकाराला मुद्दल व व्याजापोटी आतापर्यंत ९५ हजार रुपये परत केले. तरीही सावकाराच्या म्हणण्यानुसार उर्वरीत साडेसात हजार रुपये २४ एप्रिल २०२० या दिवशी देण्याचे ठरले होते.

मात्र, महिलेला ही रक्कम देता आली नाही. त्यामुळे त्या सावकाराने साडेसात हजार आणि व्याज असे एकूण पंधरा हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करत तगादा सुरू ठेवला.त्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.

त्यांनी सहकार विभागाकडे जाण्याचा सल्ला दिला. मात्र, तिची तक्रार कोणीही गांभीर्याने घेतली नाही. महाराष्ट्र दिनी सकाळीच सावकाराच्या पत्नीने त्या महिलेच्या घरी जाऊन तिला शिवीगाळ करत मारहाण केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment