अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- हॅकरकडून ( देशातील किंवा परदेशातील ) आरोग्य सेतू App चा गैरवापर करुन भारतीय सैन्य व इतर भारतीय नागरिकांचा डेटा चोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी. खात्री केल्याशिवाय ॲप डाऊनलोड करू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी केले आहे.
सध्या कोविड – १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने आरोग्य सेतू App डाऊनलोड करण्याची सूचना दिलेली आहे. या सूचनांचे पालन सर्व स्तरातून होत असल्याचे दिसून आलेले आहे.
परंतु, हॅकरने आरोग्य सेतू App मधील डाऊनलोड लिंकची छेडछाड करुन बनावट आरोग्य सेतू App तयार केले आहे. ते सोशल मिडीयामध्ये व्हायरल केले जात आहे. सदर आरोग्य सेतू App डाऊनलोड लिंकची कोणतीही शहानिशा न करता सदर App डाऊनलोड केल्याचे निदर्शनास आले आहेत .
या प्रकारामुळे भारतीय सैन्य तसेच भारतातील नागरीकांची माहिती चोरण्यासाठी याचा वापर होत असल्याचे निर्दशनास आलेले आहेत.
बनावट आरोग्य सेतु App च्या लिंक ला क्लिक केल्यास हँकरला तुमच्या मोबाईल , लॅपटॉप , संगणक , टॅब व इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसचा अॅक्सेस त्याला मिळतो .
त्यावरुन तो तुमची सर्व वैयक्तिक व खाजगी माहिती चोरी करु शकतो. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य सेतू App हे भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईट (https: //www .mygov.in/) वरुनच डाऊनलोड करावे.
कोणत्याही सोशल मिडीयावर आलेल्या लिंकवर क्लिक करुन सदरचे App डाऊनलोड करु नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय अधिकारी संदिप मिटके यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®