अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथील व्यक्तीला बाधा झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले.
पाथर्डीतील हा पहिलाच रुग्ण आहे. वाशी येथे शेवग्याच्या शेंगा विकण्यासाठी गेलेल्या या ४५ वर्षांच्या व्यक्तीस बाधा झाली आहे. रविवारी पाथर्डी तालुक्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.
जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवलेला या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती शेतमाल घेऊन वाशी मार्केटला गेली होती.
त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४४ झाली आहे. आतापर्यंत २५ रुग्णांना १४ दिवसांच्या उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे.
पुन्हा कोरोनाबाधित आढळल्याने जिल्ह्याच्या सीमेवरील नाकेबंदी कडक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. उर्वरित रुग्णांवर नगरमध्ये उपचार सुरू आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®