Nano Car: ‘टाटा नॅनो’ पेक्षाही लहान आहे ही सर्व सोयींनीयुक्त आलिशान कार, मिळतील विविध वैशिष्ट्ये

Published on -

भारतात आणि जगात अनेक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून वेगवेगळे वैशिष्ट्य असलेले वाहन निर्मिती करण्यामध्ये ह्या कंपन्यात स्पर्धा दिसून येते. कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त वैशिष्ट्य आणि सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न या कंपन्यांचा असतो. त्यातल्या त्यात अनेक इलेक्ट्रिक वाहनांची सध्या रेलचेल दिसून येत असून दुचाकीच नाही तर अनेक इलेक्ट्रिक कार देखील तयार केल्या जात आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता दिवसेंदिवस वाढत आहे.

यामध्ये जर आपण कारचा विचार केला तर आतापर्यंतचे सगळ्यात लहान कार म्हणून टाटा नॅनो या कारचा उल्लेख करावा लागेल. परंतु मायक्रो मोबिलिटी सिस्टम नावाच्या इलेक्ट्रिक वाहन तयार करणाऱ्या कंपनीने टाटा नॅनो पेक्षा देखील आकाराने लहान अशा कारची निर्मिती केली आहे. एक इलेक्ट्रिक कार असून आलीशान अशी डिझाईन करण्यात आलेली आहे. या कारचा लूक आणि आकार इतका आकर्षक आहे की पाहिल्याबरोबर लोक आकर्षित होत असून अद्याप पर्यंत ती भारतात लॉन्च कधी होणार याबाबत कोणतीही माहिती नाही.

 या कारमध्ये आहे ती वैशिष्ट्ये

ही टू सिटर इलेक्ट्रिक कार असून चार चाकी कार आहे. या कार मध्ये 28 लिटरची ट्रंक स्पेस देण्यात आले असून वजन हे 535 किलो आहे. ही इलेक्ट्रिक कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 225 किलोमीटर पर्यंत धाऊ शकते असा कंपनीचा दावा आहे. परंतु या कारचे बेस मॉडेलची रेंज 115 किलोमीटर पर्यंत आहे. महत्वाचे म्हणजे ही कार 90 किलोमीटर प्रती तास वेगाने धावू शकते.

 किती आहे या कारची किंमत?

इलेक्ट्रिक कार सिटीराईड कार म्हणून देखील ओळखली जात असून या कारचा समावेश युरोपमधील वर्ग  L/9 या वाहन श्रेणीमध्ये करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे या कारची रचना कॉम्पॅक्ट कार सारखी आहे. या कारमध्ये युरोपमध्ये तयार होणारे बहुतांश पार्ट वापरले गेले असून या कारची किमतीचा विचार केला तर स्वित्झर्लंड मध्ये $15340 आहे. भारतीय चलनात विचार केला तर बारा लाखांच्या आसपास ही किंमत जाते. युरोपमध्ये ही कार $13400 मध्ये उपलब्ध आहे. सध्या या कारची डिलिव्हरी स्वित्झर्लंड मध्ये सुरू होणारा असून त्यानंतर युरोपमध्ये सुरू होणार आहे.

 या कारची प्री बुकिंग सुरू

कंपनीने या कारचे अद्याप पर्यंत स्टेज उत्पादन सुरू केले नसून या कारचा लुक लोकांना आवडल्यामुळे त्याची फ्री बुकिंग सुरू झालेली आहे. महत्वाचे म्हणजे आतापर्यंत तीस हजार पेक्षा अधिक प्री बुकिंग या कारचे झालेले आहे. ही टू सीटर कार असून तिला एकच दरवाजा येतो आणि तो समोरून उघडतो. या वैशिष्ट्यांमुळे ती लोकांमध्ये जास्त आकर्षक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News