झणझणीत पदार्थ खायला आवडतात का? तुम्हाला माहिती हवी की कोणत्या देशात खाल्ले जातात सर्वात मसालेदार पदार्थ? वाचा माहिती

Ahmednagarlive24
Published:
s

आपल्यापैकी बरेच जण हे अस्सल खवय्ये असतात. म्हणजेच अशा व्यक्तींच्या खाण्यापिण्याच्या आवडीचा विचार केला तर त्या खूप भन्नाट अशा पद्धतीचे असतात. बऱ्याच जणांना जंक फूड, चायनीज खाद्यपदार्थ, काहींना समोसे तसेच  वडापाव सारखे तेलकट पदार्थ खायला आवडतात. त्या पद्धतीने प्रत्येकाच्या खायच्या आवडी या वेगवेगळ्या असतात. परंतु यामध्ये चमचमीत आणि झणझणीत असे स्पायसी अर्थात मसालेदार पदार्थ कुणाला आवडत नसतील असं होऊ शकत नाही. जवळपास सगळ्याच लोकांना मसालेदार आणि तिखट पदार्थ खायला खूप आवडतात.

त्यामुळे असे स्पायसी  अर्थात मसालेदार खाणाऱ्या व्यक्ती अनेक प्रकारचे पर्याय शोधत असतात. स्पायसी मध्ये विचार केला तर अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत. परंतु यामध्ये श्रीमंता पासून ते गरिबापर्यंत मसालेदार पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात नॉनव्हेज मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. बऱ्याचदा आपण जेव्हा एखादा हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये जेवायला किंवा नाश्त्याला बसतो. अगदी त्यावेळेस देखील आपण स्पायसी ऑर्डर करत असतो.

तसा भारताचा विचार केला तर  भारताची खाद्य परंपरा ही जगाच्या पाठीवर सर्वोत्तम अशी आहे. परंतु भारता व्यतिरिक्त जगातील बऱ्याच ठिकाणी असे स्पायसी खाद्यपदार्थ खूप चांगल्या पद्धतीने मिळतात. आपण कुठेही फिरायला गेलो तरी आपण मसालेदार अर्थात स्पायसी खाद्यपदार्थांचे ऑप्शन शोधत असतो. अगदी याच पद्धतीने सर्वात स्पायसी अन्नपदार्थ कोठे मिळतात हे देखील माहीत असणे गरजेचे आहे.

 जगाच्या पाठीवर या ठिकाणी मिळतात सर्वात स्पायसी फूड

मसालेदार पदार्थ आपल्यापैकी सगळ्यांनाच आवडतात. जगातील इतर देशांमध्ये देखील असे मसालेदार पदार्थ चवीने खाल्ले जातात. तसे जगातील प्रत्येक देशाची त्यांच्या खाद्यपदार्थांच्या बाबतीत एक वेगळी ओळख असते. अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज देखील ट्राय केले जातात. यामध्ये जर आपण भारताचा विचार केला तर भारतातील सर्वात आवडते मसालेदार  अन्नपदार्थ म्हणजेच नॉनव्हेज होय. याव्यतिरिक्त मसालेदार आमटी  देखील आपल्यापैकी बऱ्याच जणांना खूप आवडते. हा देखील एक  भारतातील मसालेदार अन्नपदार्थांमधील एक उत्तम पर्याय आहे.

मसाले म्हटले म्हणजे त्यामध्ये मिरची, वेलची तसेच काळीमिरी, आले, लसूण इत्यादी घटकांचा अंतर्भाव केलेला असतो. यामुळे आपल्याला अनेक भाज्या, अनेक डाळींच्या आमटी, सुप तसेच फ्राईड फूड यासारखे अनेक पर्याय मिळतात. अगदी भारताप्रमाणेच मेक्सिकन फूड देखील खूप मसालेदार असतात. या ठिकाणच्या मसालेदार पदार्थांचा विचार केला तर यामध्ये हैबानेरो,एचो, सेरानो मिर्च, एलपिनो सारखे मसाले असतात.

या मसाल्यांमुळे मेक्सिकन अन्नपदार्थांना खूप उत्तम अशी चव असते. त्यामुळे जगाच्या पाठीवर मसालेदार पदार्थ आवडणाऱ्या व्यक्तींसाठी मेक्सिकन फूड हा एक उत्तम पर्याय आहे. याशिवाय कोरियन फूड व त्या ठिकाणचे जेवण देखील खूप स्पायसी असते. कोरियन जेवणामध्ये मिळणारे चिकन बुलडक किंवा चिकन फायर खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे हे एक उत्तम आणि प्रसिद्ध असे स्पायसी मिल आहे. कोरियन व्यतिरिक्त मलेशिया या देशातील ओटक नावाची जी डिश आहे. ती देखील स्पायसी म्हणून खूप प्रसिद्ध आहे. या डिश मध्ये तुम्हाला मासे तसेच  वाळलेली मिरची व केळीच्या पानांचा समावेश केलेला असतो.या तीनही देशांव्यतिरिक्त या यादीमध्ये भारताचे नाव देखील खूप महत्त्वाचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe