यावर्षी मान्सूनचे उशिरा आगमन झाले असून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही ठिकाणचा अपवाद वगळता मुंबई आणि राज्यातील बहुतेक भागांमध्ये चांगला पाऊस पडत आहे. यावर्षी तब्बल पंधरा दिवस मान्सून उशिराने दाखल झाला असून गेल्या काही दिवसापासून राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पाऊस होत असल्यामुळे सध्या समाधानाचे वातावरण आहे.
परंतु तरी देखील पावसाच्या प्रमाणाचा विचार केला तर ते पेरणी करणे इतपत नसून अजून देखील शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. ह्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याच्या पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी ट्विट केले असून या माध्यमातून त्यांनी म्हटले आहे की येत्या पाच दिवसात राज्यात मुसळधार पाऊस बसण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे.
राज्यात पुढील पाच दिवस बरसणार मुसळधार पाऊस
हवामान खात्याच्या पुणे येथील विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी ट्विट केले असून पुढच्या माध्यमातून म्हटले आहे की येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता असून पुढील चार ते पाच दिवस पावसाचा प्रभाव असणार आहे. या कालावधीत राज्याच्या काही भागात मुसळधार ते काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे.
तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात चांगला पाऊस होणार असून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागातील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे.
मान्सून आता चांगल्या प्रकारे सक्रिय झाल्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये कोकणातील रायगड आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील घाट भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाची रिमझिम सुरू असून काही ठिकाणी जोरदार सरी कोसळत आहेत.