महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठी धरणे असून महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे धरणे आहेत. प्रत्येक धरणाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. जेव्हा ही धरणे ओव्हरफ्लो होतात तेव्हा अशा धरणांच्या ठिकाणी फिरायला जाणे व त्या ठिकाणचे विहंगम दृश्य पाहून डोळे दीपतात.
धरणांच्या ठिकाणी असलेले निसर्ग सौंदर्य मनाला निरव शांतता देऊन जाते. जर तुमचा देखील या पावसाळ्यामध्ये काही धरणांना भेट देण्याचा प्लान असेल तर तुम्ही या लेखात देण्यात आलेल्या पाच धरणांपैकी कुठेही जाऊन पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात. त्यामुळे या लेखात आपण महाराष्ट्रातील प्रमुख आणि महत्त्वाचे असे पाच धरणांची माहिती घेणार आहोत.
![u](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/07/ahmednagarlive24-u.jpg)
महाराष्ट्रातील प्रमुख पाच धरणे
1- जायकवाडी धरण– महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या पैठण या ठिकाणी जायकवाडी धरण असून मराठवाडा विभागातील जो काही दुष्काळग्रस्त भाग आहे त्या ठिकाणच्या शेत जमिनीला सिंचन सुविधेच्या दृष्टिकोनातून जायकवाडी धरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या ठिकाणी एक विद्युत प्रकल्प देखील आहे.
जायकवाडी धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे या धरणाच्या परिसरामध्ये वृंदावन गार्डनच्या धर्तीवर ज्ञानेश्वर उद्यान बनवण्यात आलेले असून हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे उद्यान आणि पक्षी अभयारण्य देखील आहे. 135 फूट उंच असलेले हे धरण खूप महत्त्वाचे असून या धरणाच्या जलाशयाचे नाव नाथसागर असे आहे. पावसाळ्यामध्ये जेव्हा हे धरण पूर्ण क्षमतेने भरते तेव्हा या ठिकाणाचा देखावा हा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो.
2- ईसापुर धरण– हे धरण देखील महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचे धरण असून हे पैनगंगा नदीवर बांधण्यात आलेले धरण आहे. या धरणाचा फायदा हा हिंगोली तसेच यवतमाळ व नांदेड या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात झालेला असून या धरणाचा जलसाठा देखील सर्वात मोठा आहे. या धरणाची उंची साधारणपणे 57 मीटर इतकी आहे.
3- उजनी धरण– हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धरण असून इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी या दोन शहरांच्या मध्ये भीमा नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणाची उंची 56.4 मीटर आणि लांबी ८३१४ फुट इतकी आहे. या धरणावर वीज निर्मिती प्रकल्पापासून त्या प्रकल्पाची क्षमता 12 वॅट इतकी आहे.
उजनी धरणाच्या जलाशयाचे नाव यशवंतसागर आहे. या धरणाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त गेट असलेले धरण आहे. उजनी धरणाला साधारणपणे 41 दरवाजे आहेत. या धरणाच्या आजूबाजूचा परिसर हा निसर्गरम्य असून पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी हे धरण एक चांगला पॉईंट आहे.
4- तोतलाडोह धरण– हे धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि जास्त उपयुक्त पाणीसाठा असलेल्या धरणांच्या यादीत चौथ्या क्रमांकाचे धरण असून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या बॉर्डरवर उभारण्यात आलेले आहे. मध्यप्रदेश राज्यातील शिंदवाडा आणि महाराष्ट्रातील नागपूर या दोन्ही ठिकाणाच्या सीमेवर या धरणाचे उभारणी करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून या धरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण या धरणातून जेव्हा पाणी सोडण्यात येते तेव्हा संपूर्ण पाणी हे महाराष्ट्रात येते. हे ७४.५ मीटर उंचीचे धरण असून या धरणाची लांबी 2230 ft इतकी आहे. या धरणाला एकूण 14 दरवाजे आहेत.
5- कोयना धरण– हे महाराष्ट्रातील पहिले धरण असून ते कोयना नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाच्या जलाशयाचे नाव शिवसागर असून कोयना नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात हे धरण असून 1954 साली या धरणाच्या बांधकामात सुरुवात झाली व 1967 साली याचे बांधकाम पूर्ण झाले. या धरणाची पाणी साठवणूक क्षमता 105 टीएमसी असून याचा वापर विद्युत निर्मितीसाठी केला जातो. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कोयना धरण हे खूप महत्त्वपूर्ण असून पावसाळ्यात जर तुमचा एखाद्या धरणाला भेट देण्याची इच्छा असेल तर कोयना धरण आहे चांगला पर्याय आहे.