सातासमुद्रापलीकडील प्रेमकहाणी: चीनची मुलगी झाली संगमनेर तालुक्यातील भोजदरी या गावची सून, वाचा ‘ही’अनोखी प्रेमकहानी

t

प्रेमात सगळं क्षम्य असतं असं म्हटले जाते. प्रेम करायला कुठल्याही प्रकारचे बंधन, राज्यांच्या किंवा देशांच्या सीमा आडव्या येऊ शकतच नाहीत. प्रेम ही अशी भावना असते तिला फक्त मनाची आणि हृदयाची भाषा समजते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपण बऱ्याचदा अनेक प्रेमाचे किस्से ऐकतो. परराज्यातील मुला मुली देखील प्रेमविवाह करतात. परंतु प्रेमापोटी चक्क देशाच्या सीमा ओलांडून प्रेम मिळवणे अशा घटना खूप कमी ऐकायला येतात.

परंतु सध्या अशीच एक प्रेमविवाहाची चर्चा सर्वीकडे रंगली असून ती म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या भोजदरी या ठिकाणी पार पडलेले अनोख्या प्रेमविवाहाची. या प्रेमविवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे या विवाहात नववधू ही चक्क चीनची तर मुलगा हा भोजदरी या खेडेगावातला आहे. चला तर मग या लेखात आपण या अनोख्यात प्रेम कहानी विषय जाणून घेऊ.

 असे जमले दोघांचे सूत

त्याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की, संगमनेर तालुक्यात असलेल्या भोजदरी येथील राहुल हांडे हा तरुण योगाचे शिक्षण घेण्यासाठी व नोकरी करिता चीनला गेलेला होता. यादरम्यान  योगाचे शिक्षण देत असताना त्या ठिकाणी राहुल याची चिनी मुलगी शान यान छाग तिच्याशी ओळख झाली व या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. साधारणपणे सहा वर्षांपूर्वीचा विचार केला तर राहुल नोकरीकरिता चीनला गेलेला होता. अनोळखी ठिकाणी गेलेल्या चीनमध्ये  योगाचे शिक्षण देत असताना त्याची सहकारी म्हणून शान ही काम करत होती.

दरम्यानच्या काळामध्ये चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला व या कालावधीमध्ये शानने राहुलची उत्तम काळजी घेतली. त्यामुळे राहुलला तिचा स्वभाव खूप आवडला. त्यांच्यात चांगली मैत्री झाली व या मैत्रीच्या रूपांतर पुढे प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी सोबत आयुष्य जगण्याचे ठरवले व चीनमध्ये रजिस्टर मॅरेज करून  त्यानंतर संगमनेर येथे त्यांनी आपल्या हिंदू पारंपारिक पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. राहुल आणि शान या दोघांनी चीनमध्ये रजिस्टर लग्न केले व त्यानंतर राहुल शानला घेऊन स्वतःच्या गावी आला.

या ठिकाणी पारंपारिक हिंदू पद्धतीनुसार सर्वांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा लग्न गाठ बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यामध्ये अगदी हळदीपासून सर्व लग्नाच्या विधी पार पाडल्या गेल्या. या सगळ्या परंपरा चिनी असलेल्या शान साठी खूप नवीन होत्या. या सगळ्या परंपरा पाहून ती अगदी भारून गेली. तसेच या ठिकाणचे वातावरण आणि निसर्ग बघून तिला खूप आनंद झाला. लग्नामध्ये पार पडलेले विधी आधी शानने कधीच पाहिलेले नव्हते. चीन सारख्या देशात पंधरा मिनिटात होणारा लग्नसमारंभ  मात्र भारतात पाच दिवस चालतो हे तिच्यासाठी अप्रूफ होते.

 या लग्नाबद्दल राहुलच्या आईवडिलांचं काय आहे मत?

त्या लग्नाबद्दल राहुलच्या आई-वडिलांनी प्रतिक्रिया दिली की कोरोना कालावधीमध्ये चीनमध्ये राहुलची योग्य पद्धतीने तिने काळजी घेतली व त्यामुळे शानचा स्वभाव त्याला खूप आवडला होता. राहुलने आम्हाला कळवले होते की तो चीनमधील मुलीशी लग्न करणार आहे. हे ऐकून जरा मला आश्चर्यच वाटले होते की बाहेरच्या देशातील मुलगी सून म्हणून केल्यानंतर आपल्याकडील लोक काय म्हणतील किंवा तिकडच्या मुलीला इथली परिस्थिती नेमकी मानवेल का?

इत्यादी प्रश्न त्यांना पडलेले होते. परंतु शानने इकडची परंपरा व संस्कृती तसेच माणसे देखील लवकरच आपली करून घेतली. त्यामुळे आमच्या मुलाचे लग्न चीनच्या मुलीशी झालंय व आम्हाला चिनची सुनबाई मिळाली याचा आम्हाला गर्व आहे अशी देखील प्रतिक्रिया राहुलच्या आई वडिलांनी दिली.

या प्रेम कहाणी वरून दिसून येते की प्रेम हे मनाची भावना असून याला कुठल्याही सीमा तसेच जाती धर्माचे बंधन नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe