Property Card: सातबारा उतारा, अनेक प्रकारचे शासकीय दाखले आणि बरच काही मिळेल ‘या’ ॲपवर, घरबसल्या होतील कामे

Published on -

Property Card:-  सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे. इंटरनेटच्या मदतीने जग अगदी जवळ आले असून तुम्हाला हवी असलेली माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आता तंत्रज्ञानाने शिरकाव केला असून अनेक प्रकारची कामे ऑनलाईन पद्धतीने अगदी घरबसल्या करता येणे शक्य झाले आहे. यामध्ये शासकीय कामांचा विचार केला तर नागरिकांना अनेक दाखल्यांसाठी किंवा महत्त्वाच्या कागदपत्रांकरिता कार्यालयांच्या हेलपाट्या मारण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

सरकारी काम म्हटले म्हणजे वेळेवर होईलच अशी कुठल्याही प्रकारचे अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरते. परंतु आता नागरिकांना या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये  अनेक प्रकारचे शासकीय कामे देखील घरबसल्या मोबाईलवरून करता येणे शक्य झाले आहे. अनेक प्रकारचे शासकीय कागदपत्र किंवा दाखले आता मोबाईल वरून देखील मोबाईल अप्लिकेशनच्या मदतीने नागरिकांना मिळवता येणे शक्य झाले आहे. याचा अनुषंगाने या लेखांमध्ये आपण या महत्त्वाच्या असलेल्या मोबाईल ॲप्लिकेशन बद्दल माहिती घेणार आहोत.

 उमंग मोबाईल ॲप ठरत आहे नागरिकांना वरदान

नागरिकांना अनेक प्रकारच्या दाखल्यांची गरज भासते. त्यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक कामासाठी किंवा नोकऱ्यांसाठी लागणारे दाखले तसेच जमिनीच्या सातबारा इत्यादी दाखल्यांची आवश्यकता नागरिकांना बऱ्याचदा भासते. याकरिता नागरिकांना अनेक शासकीय कार्यालयांच्या चकरा माराव्या  लागत होत्या. परंतु आता तुम्हाला आवश्यक असलेले अनेक महत्त्वाचे कागदपत्रे आता केंद्र सरकारने विकसित केलेल्या उमंग मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरबसल्या मिळवता येणार आहेत.

 उमंग ॲप अशा पद्धतीने करते मदत

या ॲपच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या दाखले काढण्यासाठी या अँपवर असलेल्या राज्याची किंवा ई- जिल्हा सेवा या पर्यायावर क्लिक करताच तुम्ही ज्या राज्याचे आहात त्या राज्याचे पोर्टल तुमच्यासमोर सुरू होते. आता तुम्हाला सातबारा उतारा काढायचा असेल तर  तलाठी महाराष्ट्र अशी निवड केल्यानंतर लागलीच आपले सरकार पोर्टल सुरू होते. एवढेच नाही तर या ॲपवर तुम्हाला अनेक सार्वजनिक स्वरूपाच्या तक्रारी देखील करता येतात.

या ॲपच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या उपलब्ध होतात. यामध्ये राज्य राजपत्र तसेच महसूल खात्याचे कागदपत्रे, पोलीस वेरिफिकेशन प्रमाणपत्र, कामगार विभागाशी संबंधित दाखले, महाराष्ट्र जमीन रेकॉर्ड अर्थात भूमी अभिलेख विभागाची कागदपत्रे, राज्य उत्पादन शुल्क आणि सामान्य सेवा विभागाचे कागदपत्रे असे अनेक पर्याय यामध्ये दिसतात. यापैकी तुम्हाला जे कागदपत्र किंवा दाखला हवा आहे त्यासाठी तुम्ही या ॲपच्या माध्यमातून अर्ज करू शकतात.

 रेशनकार्ड संबंधी देखील मिळते माहिती

याव्यतिरिक्त तुम्हाला रास्त भाव दुकानाची किंवा रेशन कार्ड संबंधित काही माहिती मिळवायची असेल तरी देखील तुम्ही आता या ॲप्लिकेशनची मदत घेऊ शकता. उमंग ऍप वर असलेल्या माझे रेशन या पर्यायाची निवड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळचे रास्त भाव दुकानांची सगळी यादी दिसते व रेशन कार्ड संबंधित महत्त्वाचे डिटेल्स देखील तुम्हाला उपलब्ध होते. रेशन कार्ड संबंधी तपशील जाणून घ्यायचा असेल तर तुमचा रेशन कार्ड क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती यावर मिळते. एवडेच नाहीतर मागील सहा महिन्यांच्या कालावधीत तुम्ही रेशन दुकानातून काय खरेदी केलेली आहे याचे देखील डिटेल्स मिळते.

 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला सातबारा देखील मिळतो

महाभूमी संकेतस्थळावर सातबारा हा डिजिटल स्वाक्षरी असलेला आपल्याला मिळतो. या वेबसाईटच्या मदतीने नागरिकाला कुठल्याही जिल्ह्यातील सातबारा मिळवता येतो. तसेच उमंग ऍप वर असलेला आपली चावडी या पर्यायाची निवड केल्यानंतर प्रॉपर्टी कार्ड देखील उपलब्ध होते.

तसेच जमिनीच्या संबंधी असलेल्या नोदींचा असलेला फेरफार चा प्रकार, यावर हरकत घेण्याची शेवटची तारीख तसेच फेरफार नोंदणी क्रमांक इत्यादी माहिती प्रत्येक गावानुसार मिळते. उमंग ॲपच्या  माध्यमातून सातबारा हे शेतकऱ्यांचे निगडित असलेले महत्त्वाचे कागदपत्र देखील डाऊनलोड करता येते. अशा पद्धतीने तुम्हाला हवे असलेले कागदपत्रे आणि माहिती तुम्हाला आता उमंग अप्लिकेशनच्या माध्यमातून अगदी घरबसल्या मिळते.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe