Health News : पाणी हे जीवन आहे. शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी रोज ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. तसेच शरीरातील विषारी घटक पाणी बाहेर फेकते. त्यामुळे शरीर निरोगी राहते.
उन्हाळ्यात तर सतत तहान लागते. उष्णतेमुळे शरीरातून जास्त घाम येतो. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. अशावेळी जास्त तहान लागते. तहान भागवण्यासाठी अर्धा ते एक ग्लास पाणी पर्याप्त आहे. मात्र, कितीही पाणी प्यायल्यानंतरही तहान ‘भागत नाही.
याचे कारण काय, हे आज आपण जाणून घेऊया. जास्त तहान लागण्याचे कारण काय? :- शरीरात जर आधीपासून पाण्याची कमतरता असेल तर एक-दोन ग्लास पाणी पिऊनही तहान भागत नाही. अशावेळी थोड्या-थोड्या वेळाने सतत पाणी पित राहा.
काही जणांच्या तोंडात सलाइव्हाची मात्रा कमी प्रमाणात असते. अशावेळी तोंड सारखे सुके पडते. म्हणून सतत पाणी पिऊनही तहान भागत नाही. मधुमेह हा असा एक आजार आहे,
ज्यामुळे अन्य आजारांना आमंत्रण मिळते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये एक लक्षण दिसते, ज्यामध्ये त्यांना अतिप्रमाणात तहान लागते. त्यामुळे कितीही पाणी प्यायले तरी त्यांचे समाधान होत नाही.