Health Tips : बदलत्या हवामानामुळे आजारी पडतायं का? आहारात करा “या” पेयाचा समावेश !

Sonali Shelar
Published:
Health Tips

Health Tips : पावसाळा आला की सोबत आजारही घेऊन येतो. म्हणून या मोसमात जास्त आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळा आला की, सर्दी, खोकला, यांसारखे आजार होतात. तसेच रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते, म्हणूनच या मोसमात योग्य आहार घेणे खूप गरजेचे आहे. या हंगामात लोक विविध पदार्थांचा आस्वाद घेतात, ज्यामुळे पावसाळ्याची मजा द्विगुणित होते.

या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. मात्र बदलत्या ऋतूत निरोगी राहण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या ऋतूमध्ये तुम्ही काढा अवश्य घ्यावा, ज्यामुळे तुम्ही अनेक समस्यांपासून आराम मिळवू शकता.

काढा हा एक आयुर्वेदिक घरगुती उपाय आहे, जो अनेक औषधी वनस्पती आणि मसाल्यापासून बनवला जातो. हे मिश्रण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि संसर्गाशी लढण्यासाठी सर्वात स्वस्त घरगुती उपाय आहे. चला तर मग जाणून घेऊया काढा बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे.

साहित्य

पाणी : 2 कप
आले : 1 तुकडा
लवंग : ४
काळी मिरी : ५-६
तुळस पाने : 5-6
मध : 1 टीस्पून
दालचिनी : २

कृती

सर्व प्रथम एका पातेल्यात पाणी टाकून गरम करा.
आता आले, लवंगा, काळी मिरी आणि दालचिनी ठेचून घ्या.
पातेल्यात तुळशीच्या पानांसह हे साहित्य घाला.
सुमारे 20 मिनिटे मध्यम आचेवर उकळवा.
नंतर ते गाळून घ्या आणि थोड्या प्रमाणात मध घाला.

काढा पिण्याचे फायदे 

हे घरगुती पेय दाहक-विरोधी आणि जंतुनाशक गुणधर्मांनी समृद्ध आहे. यामुळे सर्दी आणि त्याची लक्षणे कमी होतात.

काढ्यामध्ये उपस्थित आयुर्वेदिक घटक अँटी-व्हायरल गुणधर्मांनी समृद्ध आहेत, जे सर्दी आणि खोकल्यापासून आराम देण्यास उपयुक्त आहेत.

यामध्ये असलेल्या औषधी वनस्पती शरीरातील श्लेष्मा कमी करण्यास मदत करतात.

काढा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि संक्रमणांशी लढण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे सर्दी, खोकला आणि घसा खवखव दूर होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe