Fixed Deposit : सध्या सर्वत्र बचतीला जास्त महत्व दिले जात आहे. कोरोना काळानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. सुरक्षित भविष्याचा विचार करता लोकं मोठ्या प्रमाणात बचतीला प्रोत्साहन देताना दिसत आहे.
बचत किंवा गुंतवणूक करण्याचा विचार येतो तेव्हा प्रथम पर्याय समोर येतो तो म्हणजे मुदत ठेव. मुदत ठेव हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानला जातो. कारण यामध्ये परताव्याची खात्री असते. आणि पैसे बुडण्याचा धोकाही नसतो. म्हणूनच सामान्य लोकांमध्ये मुदत ठेव हा गुंतवणुकाचा सर्वात लोकप्रिय पर्याय मानला जातो.
अशातच तुम्हीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर काही बँका FD वर 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देत आहेत. जे सुकन्या समृद्धी योजना, EPF आणि PPF मध्ये मिळालेल्या व्याजापेक्षा जास्त आहे. RBI ने रेपो रेट वाढवल्यापासून अनेक बँका FD वर चांगले व्याज देत आहेत. जर तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करून चांगले व्याज मिळवायचे असेल, तर हे दोन FD पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात.
या दोन बँका एफडीवर देत आहेत 9 टक्क्यांहून अधिक व्याजदर
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँक आपल्या गुंतवणूकदारांना बँक एफडीवर 9 टक्के व्याज देत आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 1001 दिवसांसाठी केलेल्या FD वर वार्षिक व्याजदर 9.50 टक्के आहे आणि वेळच्या नागरिकांसाठी वार्षिक व्याजदर 9.00 टक्के आहे. बँकेत सर्वाधिक व्याज फक्त 1001 दिवसांच्या एफडीवर दिले जात आहे. याशिवाय बँक वेळेनुसार एफडीवर 4.5 टक्के ते 9 टक्के व्याज देत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक देखील आपल्या ग्राहकांना FD वर चांगला परतावा देत आहे. ज्यामध्ये केवळ पाच वर्षांच्या कालावधीसाठी केलेल्या एफडीवर गुंतवणूकदारांना वार्षिक ९.१ टक्के व्याज दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना ९.६ टक्के व्याज दिले जात आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेत, सर्वसामान्यांना एफडीवर वार्षिक ४ टक्के ते ९.१ टक्के दराने व्याज दिले जात आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना ४.५ टक्के ते ९.६ टक्के व्याज दिले जात आहे.