अनैतिक संबंधात त्रास झाल्याने केली हत्या, नंतर अंत्यसंस्कारातही आला, शेवटी पोलिसांनी तपास लावलाच !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे मुकुंद जयसिंग वाकडे या युवकाच्या निर्घृण खूनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

याप्रकरणी दत्तात्रय अंकुश पठाडे (रा. आढळगाव) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपीचे मयताच्या मोठ्या भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरुन मयत मुकुंद भावजयीला त्रास देत असल्यामुळे काटा काढल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

धक्कादायक म्हणजे आरोपीने चलाखी दाखवत खूनानंतर मयताच्या अंत्यसंस्कारासह अन्य उत्तर कार्यात आरोपी बिनधास्तपणे वावरत होता. आज मात्र गायींच्या गोठ्यात झोपला असताना पोलिसांनी चोवीस तासाच्या आत त्याला अटक करत हत्येचा उलगडा केला.

शनिवारी रात्री मुकुंद जयसिंग वाकडे या युवकाचा खून झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. पोलिस अधीक्षक अखिलेश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिक्षक संजय सातव यांनी पोलिस निरीक्षक दौलत जाधव,

तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील यांनी वेगवेगळी तपास पथके नेमून सखोल तपास सुरु केला.

चौकशी करत असताना दत्तात्रय पठाडे याच्या संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर त्यास ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

मयत मुकुंदला आरोपीच्या भावजयी सोबतचे अनैतिक संबंध माहित झाल्यामुळे तो भावजयीला ब्लॅकमेल करत होता तसेच एकदा अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला.

त्यानंतर आरोपी आणि मयताच्या भावजयीच्या चिथावणीवरुन मुकुंदचा धारदार शस्त्राने खून करण्याचा कट केला. खून केल्यानंतर आरोपीने शस्त्र विहिरीत आणि अंगावरील कपडे आढळगाव शिवारातच फेकुन दिले पोलिसांनी ते जप्त केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment