अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- राहुरी शहरात आज दुपारी दारू विक्रीच्या दुकानासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तेथे सोशल डिस्टन्सिंग ठेवले जात नसल्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी तळीरामांवर लाठीचार्ज केला. तसेच तीन दुकानांना प्रशासनाने सील ठोकले.
पोलिसांनी तळीरामांवर लाठीचार्ज केल्याने एकच धावपळ उडाली. जिल्हाधिका यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून राहुरीचे तहसीलदार एफ . आर. शेख यांनी तीन दुकानांना सील ठोकले.
त्यामुळे अर्ध्या तासामध्ये दुकाने बंद करण्याची वेळ दुकान मालकांवर आली. दारूची दुकाने सुरू होणार म्हणून तळीरामांनी दुकानांसमोर गर्दी केली होती.
मात्र सकाळी दारूची दुकाने उघडली नाही. फिरत्या जिपवरून दारूची दुकाने उघडू नयेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. मात्र अचानक दुपारी दारूची दुकाने उघडली.
तीनही दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सिंगचा सर्वत्र फज्जा उडाला. याची माहिती तहसीलदार एफ . आर . शेख व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना समजली.
त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील परिस्थिती पाहून तहसीलदार शेख यांनी लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला. त्यानंतर किशोर वाईन्स व सुनील वाइन्स या दोन ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
त्यामुळे तळीरामांची एकच धांदल उडाली. तहसीलदारांच्या आदेशानुसार किशोर वाईन्स, मोटलानी वाईन सुनील वाईन यांना सील ठोकण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®