खडू शिल्पातून दाखविली कोरोनाची भयानकता आणि उपाय …कोरोना हारेल, विश्‍व जिंकेल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,5 मे 2020 :- कोरोना नावाच्या विषाणूरुपी राक्षसाने संपूर्ण विश्‍वालास आपल्या विळख्यात घेतले आहे. लाखो लोकांना मृत्यूच्या लाटेत लोटणार्या या महाभयंकर राक्षसाचा सामना केवळ आणि केवळ आपण सर्व मिळूनच करु शकतो.

यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे, अत्यंत आवश्यक आहे. या महत्वाच्या सूचना आणि राक्षसरुपी या विषाणूची भयानकता छोट्याशा खडू शिल्पात कोरली आहे.

नगरच्या कला शिक्षक अशोक डोळसे यांनी. तीन इंच खडूच्या वरच्या भागात पूर्णाकृती पृथ्वी दर्शविली असून, या पृथ्वीला आपल्या अनेक हातांनी कोरोनारुपे राक्षसाने घट्ट विळखा घातलेला आहे.

या विषाणूची भयानकता दाखविण्यासाठी पुराण कथेतील राक्षसाचा जिभ बाहेर काढलेला टोकदार अनेक दात असलेला चेहरा दाखविला आहे. या अत्यंत लहान आकाराच्या शिल्पातही चेहर्यावरील भयानकता दिसत आहे.

रंगकामामुळे तर पृथ्वी आणि हा विषाणूरुपी राक्षस अधिक लक्षवेधी वाटतात. उरलेल्या खडूवर या परिस्थितीला कसे सामोरे जायचे ते शिल्पांकृत केले आहे.

मास्क घातलेला मानवी चेहरां यापुढे नियमित मास्क घालण्याची सूचकता दशर्वितो तर घरातच रहा, सुरक्षित आणि आनंदी रहा हे प्रतिकांच्या माध्यमातून दर्शविले आहे.

हात स्वच्छ साबणाने कसे धुवावे हे अत्यंत बारकाईने कोरलेले दिसते. दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर हे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिकात्मक कोरले आहे.

यासर्व दक्षता घेतल्यातर आपण नक्कीच या महामारीपासून सुरक्षित राहू अशी खात्री असल्याचे आणि शेवटी ‘गो कोरोना’ ही आंतरमानातून दिलेली आरोळी अक्षरात दर्शविली आहे.

हे शिल्प सुंदर नक्कीच नसले तरी परिस्थितीची दाहकता आणि सुरक्षेचे संदेश मात्र देत आहे. लॉकडाऊनच्या या कालावधीत डोळसे यांनी विविध कलाकृती साकारल्या त्यातील ही एक उत्तम संदेश वाहक, असे ‘खडूशिल्प’ आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment