Post Office Schemes : त्वरित करा ‘या’ योजनेत गुंतवणूक, मिळेल लाखोंचा बंपर परतावा; करही वाचेल

Post Office Schemes

Post Office Schemes : अनेकजण आपल्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. त्यापैकी अनेकजण कोणतीही जोखीम नसणाऱ्या आणि जबरदस्त परताव्या देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करतात.

जर तुम्हीही गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर आता तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत चांगला परतावा मिळत आहे. शिवाय त्यामुळे तुमचा करही वाचू शकतो. कोणत्या आहेत या योजना जाणून घ्या.

जाणून घ्या वेगवेगळे गुंतवणूक पर्याय

1) पोस्ट ऑफिस बचत खाते: या योजनेत वार्षिक 4% व्याज दर मिळत असून पूर्णपणे करपात्र व्याज आणि TDS कपात नाही.

2) 5-वर्ष पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खाते : ही योजना तुम्ही 100 रुपयांच्या मासिक ठेवीपासून सुरु करू शकता. यात वार्षिक 6.5% व्याज दर मिळतो.

3) पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते : 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसह, बँक मुदत ठेवीप्रमाणेच यातील व्याजाची गणना त्रैमासिक करण्यात येते. आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीतील दर एका वर्षाच्या खात्यासाठी 6.9%, दोन तसेच तीन वर्षांच्या खात्यांसाठी 7% आणि पाच वर्षांच्या खात्यासाठी 7.5% व्याज मिळतो.

4) पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते : 7.40% च्या नियमित मासिक उत्पन्नासह कमी जोखमेसह गुंतवणूक करता येते. तसेच या योजनेचा लॉक-इन कालावधी पाच वर्षांचा आहे.

5) ज्येष्ठ नागरिक बचत योजना : ही सरकार-समर्थित सेवानिवृत्ती योजना असून योजना आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसर्‍या तिमाहीसाठी 8.2% व्याज दरासह एकरकमी ठेवींना परवानगी दिली जाते.

6) 15-वर्ष सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते : कलम 80C अंतर्गत प्रति आर्थिक वर्ष 1.5 लाख रुपयांपर्यंत आयकर कपातीसह एक लोकप्रिय गुंतवणूक योजना आहे. तर यामुळे दर वर्षी 7.1% करमुक्त व्याज मिळते.

7) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र : पाच वर्षांच्या कार्यकाळासह, NSC प्रत्येक वर्षी 7.7% दर देते. तसेच व्याज दरवर्षी चक्रवाढ होते .

8) किसान विकास पत्र : KVP मधील तुमची गुंतवणूक 123 महिन्यांत दुप्पट होते. या योजनेतील सध्याचा व्याज दर 7% प्रतिवर्ष इतका आहे.

9) सुकन्या समृद्धी खाती : खास 10 वर्षांखालील मुलींसाठी तयार करण्यात आली असून SSA आकर्षक 8% वार्षिक व्याज देते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe