8th Pay Commission Update : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जात आहेत. तसेच मार्च २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. आता कर्मचाऱ्यांसाठी लवकरच सरकारकडून आणखी एक मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वर्षातून दोन वेळा वाढ केली जाते. यावर्षी २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मार्च महिन्यामध्ये पहिली DA वाढ करण्यात आली होती. मात्र कर्मचाऱ्यांची दुसरी DA वाढ करण्यात आलेली नाही.

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आल्यानंतर त्यांच्या पगारात देखील वाढ होते. आता कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या DA मध्ये लवकरच मोदी सरकारकडून वाढ केली जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.
सरकार डीए ४ टक्क्यांनी वाढवू शकते
केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्यातील महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के झाला आहे. आता कर्मचाऱ्यांची दुसरी DA वाढ देखील ४ टक्क्यांनी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा DA ४६ टक्के होऊ शकतो.
केंद्र सरकारकडून ८व्या वेतन आयोगाबाबत माहिती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना ८वा वेतन आयोग लागू होणार की नाही? चला तर जाणून घेऊया
आठवा वेतन आयोग सरकार आणणार का?
केंद्र सरकारने 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेवर नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सध्या त्यांच्याकडे कोणताही प्रस्ताव नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याबाबत खुलासा केला आहे. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे.
आता महागाई भत्ता ४२ टक्के आहे
कर्मचाऱ्यांचा सध्या महागाई भत्ता ४२ टक्के आहे. जर कर्मचाऱ्यांची दुसरी DA वाढ ४ टक्के झाली तर कर्मचाऱ्यांचा DA ४६ टक्के होऊ शकतो. पुढील वर्षी कर्मचाऱ्यांचा DA ५० टक्के होऊ शकतो. त्यामुळे केंद्राकडून कर्मचाऱ्यांसाठी ८वा वेतन आयोग लागू केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.