Oppo A17 : 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असणारा Oppo चा बजेट फोन आता स्वस्तात खरेदी करता येणार, पहा ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Oppo A17 : ओप्पो भारतीय बाजारात अनेक स्मार्टफोन लाँच करत असते. त्यातील काही स्मार्टफोन्स हे खूप महाग असतात तर काही स्मार्टफोन्स खूप स्वस्तात असतात. कंपनीने काही दिवसांपूर्वी Oppo A17 हा बजेट फोन लाँच केला होता. आता तुम्ही हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता.

या फोनची किंमत 14,999 रुपये इतकी आहे. परंतु तुम्हाला Amazon च्या डीलमध्ये 17% डिस्काउंटसह खरेदी करता येईल. इतकेच नाही तर या स्मार्टफोनवर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येईल. त्यामुळे त्याची किंमत आणखी स्वस्तात खरेदी करता येईल. परंतु तुम्हाला या ऑफरचा लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे, कारण ही ऑफर काही दिवसांसाठी असणार आहे.

जाणून घ्या Oppo A17 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनीच्या या बजेट स्मार्टफोनमध्ये तुम्हाला एकूण 8 GB RAM सोबत 4 GB रिअल आणि 4 GB व्हर्च्युअल रॅम मिळू शकते. स्टोरेजचा विचार केला तर या स्मार्टफोनचे अंतर्गत स्टोरेज 64 जीबी इतके मिळत आहे. तर या अंतर्गत स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने तुम्हाला 256 जीबीपर्यंत वाढवता येईल. कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर दिला आहे. कंपनीचा हा बजेट स्मार्टफोन सर्वोत्तम इन सेगमेंट डिस्प्लेने सुसज्ज असणार आहे.

त्याशिवाय तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये 720×1612 पिक्सेल रिझोल्युशनसह 6.56 इंच HD डिस्प्ले पाहायला मिळेल. हा डिस्प्ले 60Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच फोटोग्राफीसाठी कंपनीकडून या स्मार्टफोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50-मेगापिक्सेल प्राथमिक लेन्ससह 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश असणार आहे.

तर सेल्फीसाठी कंपनी स्मार्टफोनमध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जात आहे. फोनची बॅटरी 5000mAh ची आहे. हा फोन Android 12 वर आधारित ColorOS 12.1 वर काम करेल. इतकेच नाही तर तुम्हाला कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम, वाय-फाय 5, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे पर्याय दिले आहेत.