आमदार प्राजक्त तनपुरे आक्रमक,म्हणाले पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहे की नाही ?

Maharashtra News

Maharashtra News : राहुरी तालुक्यातील उंबरे येथील घडलेली घटना अतिशय निंदणीय आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून त्याची पाळेमुळे शोधून काढून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार तनपुरे यांनी केली आहे. विनाकारण कुणाला त्रास देण्याचा प्रयत्न झाला किंवा कुठल्याही घटनेत सर्वसामान्यांना त्रास झाला तर अधिवेशनात आवाज उठवेल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दोन समाजात तणाव निर्माण झाला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी शांतता बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आमदार तनपुरे यांनी येथे नागरिकांशी संवाद साधला व पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.

आमदार तनपुरे म्हणाले, की येथील कुठल्याही हिंदू बांधवांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी. या घटनेतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहे की नाही? असा प्रश्न तनपुरेंनी उपस्थित केला.

अनेक पालकांनी आपल्या मुली शाळेतून काढून घेतल्या हे दुर्दैवी आहे आणि ते पोलीस प्रशासनाचे अपयश आहे. त्यामुळे असली वेळ भविष्यात येऊ नये अन्यथा आम्ही लक्ष घालू, असेदेखील यावेळी आमदार तनपुरे यानी यावेळी म्हटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe