जगातील एकूण वाघांपैकी तब्बल ७५ टक्के वाघ एकट्या भारतात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India News : भारतातील वाघांची संख्या ३,६८२ वर पोहोचल्याची माहिती केंद्र सरकारने जारी केलेल्या ताज्या अहवालातून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त शनिवारी जारी केलेल्या या अहवालानुसार, जगातील एकूण वाघांपैकी तब्बल ७५ टक्के वाघ एकट्या भारतात आहेत.

दर चार वर्षांनी होत असलेल्या व्याघ्रगणनेनुसार, ७८५ वाघांसह मध्य प्रदेश पुन्हा एकदा सर्वाधिक वाघ असलेले राज्य ठरले आहे. या यादीत महाराष्ट्र ४४४ वाघांच्या डरकाळीमुळे चौथ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनानिमित्त केंद्रीय वन, पर्यावरण व अनेक राज्यांत संख्या घटली वातावरण बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या उपस्थितीत शनिवारी देशातील वाघांच्या आकडेवारीविषयीचा विस्तृत अहवाल जारी करण्यात आला.

देशात दर चार वर्षांनी व्याघ्रगणना केली जाते. त्यानुसार २०१८ साली २,९६७ वर असलेली वाघांची संख्या २०२२ साली ३,६८२ वर पोहोचली. म्हणजेच देशातील वाघांची संख्या दरवर्षी

अनेक राज्यांत संख्या घटली

अरुणाचल प्रदेशातील वाघांची संख्या ४ वर्षांत ७० टक्क्यांनी घटली. २०१८ साली २९ वर असलेली वाघांची संख्या २०२२ साली ९ पर्यंत खालावली. तर ओडिशातही हा आकडा २८ वरून २० वर आला. ५ वाघ असलेल्या झारखंडमध्ये आता केवळ १ वाघ राहिलाय.

छत्तीसगडमध्ये ही संख्या १९ वरून १७ वर, तर तेलंगणात ही संख्या २६ वरून २१ वर घसरली आहे. मिझोरममध्ये २००६ साली ६ वाघ होते, आता तिथे व नागालॅण्डमध्ये एकही वाघ नाही. पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागातील वाघांची संख्याही १० वरून २ वर आल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.