अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे मुकुंद जयसिंग वाकडे या युवकाच्या झालेल्या खूनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याप्रकरणी दत्तात्रय अंकुश पठाडे ( रा. आढळगाव ) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे मयताच्या मोठ्या भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते.
त्यावरुन मयत मुकुंद भावजयीला त्रास देत असल्यामुळे काटा काढल्याची कबुली आरोपीने दिली होती.
शनिवारी रात्री मुकुंद जयसिंग वाकडे या युवकाचा खून झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. खूनाच्या तपासाचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते.
पोलिस अधीक्षक अखिलेश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय सातव यांनी पोलिस निरीक्षक दौलत जाधव,
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील यांनी वेगवेगळी तपास पथके नेमून सखोल तपास सुरु केला.
चौकशी करत असताना दत्तात्रय पठाडे याच्या संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर त्यास ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.
मयत मुकुंदला आरोपीचे भावजयी सोबतचे अनैतिक संबंध माहित झाल्यामुळे तो भावजयीला ब्लॅकमेल करत होता तसेच एकदा अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने मयताच्या भावजयीच्या चिथावणीवरुन मुकुंदचा धारदार शस्त्राने खून करण्याचा कट केला.
खून केल्यानंतर आरोपीने शस्त्र विहिरीत आणि अंगावरील कपडे आढळगाव शिवारातच फेकुन दिले पोलिसांनी ते जप्त केले आहे. या गंभीर गुन्ह्यात आणखी आरोपी असल्याची शक्यता असून तसा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®