मराठा सोयरीक ग्रुपच्या माध्यमातून 752 लग्ने

Ahmednagarlive24
Published:

नगर : शेतकर्‍याची मुले व मुली साठी तसेच उपवर वधु-वरांसाठी अपेक्षित सोयरीक मिळावी या उद्देशातुन जयकिसन वाघपाटील, बाळासाहेब वाकचौरे, अशोक कुटे, लक्ष्मणराव मडके, श्रीमती नंदाताई वराळे, सौ.मायाताई जगताप, सौ.शितलताईचव्हाण, सौ.जयश्री कुटे, सौ.मनिषा वाघ यांनी व्हाटसअप वर ’मराठा सोयरीक’ हा ग्रृप तयार केला या ग्रृपच्या माध्यमातूनवधु-वर यांचे फोटो व बायोडाटा देवाण-घेवाण सुरु झाली या माध्यमातून आवडलेल्या स्थळांना संबंधित पालकांनी संपर्क करुनसोयरीक जमविल्या गेल्या दोन वर्षांत 752 जणांची सोयरीक जमविल्या गेल्या त्यांचे लग्न मोठ्या उत्साहात पार पडले आहेत.

ग्रृप वर वधु-वर व त्यांच्या नातेवाईकांचा वाढता प्रतिसाद पाहून या ग्रृप चे मुख्य अ‍ॅडमिन जयकिसन वाघ , यांच्या सह विठ्ठलराव गुंजाळ,शरदराव निमसे,आबासाहेब राऊत,रामनाथ गरड,राजेश सरमाने, विनोद वाडेकर, चंद्रकांत गुंजाळ, इंजि.चंद्रकांतनवले,राजेश सरमाने , तारकराम झावरे, बाळासाहेब भदगले, बाळासाहेब आढाव ,प्रा. शिवाजीराव देवढे,त्यांच्या सहकार्यांनी वधु-वर मेळाव्याची संकल्पना मांडली.

या मराठा सोयरीक ग्रृप ला राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षकांनी एकत्र येऊन सर्व सामान्य शेतकर्‍याचा खर्चआणि वेळ वाचावा तसेच त्यांचे मुलं आणि मुलींसाठी घरबसल्या चांगल्या स्थळांची माहिती मिळावी या उद्देशाने राज्यभरातजिल्हा व तालुकानिहाय ग्रृप तयार केले असुन आता गावनिहाय सोयरीक ग्रृप तयार करण्याचे नियोजन असुन मराठासमाज्याच्या सहकार्याने मराठा समाज वधु-वरांच्या थेट भेट परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि. 2जुन 2019 रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत पांडुरंग लॉन्स, स्टेशन रोड, राहुरी येथे होणार आहे. मराठा समाजामध्ये स्थळबघताना सरकारी नोकरी, हुंडा, सोंदर्य, इतर मालमता अशा अनेक अपेक्षा वाढल्यामुळे लग्न जमवणे ही प्रक्रिया अवघड झाल्यानेमेळाव्याची गरज आहे असे मंदाताई निमसे यांनी सांगितले.

या मेळाव्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे जोडीदार शोधता येतो. आता जिल्हानिहाय मेळावे असल्यामुळे इच्छुक वधूवरांनी वपालकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. येथे सकाळी 10 ते 3 या वेळेत होणार आहे. आतापर्यंत मराठासोयरीक च्या माध्यमातून विविध जिल्ह्यात यशस्वी वधु-वर मेळावे झाले आहे. त्या मेळाव्यांच्या आजपर्यंत अनेक विवाह जमले आहेत.

या मेळाव्यात वधु-वरांची नोंदणी होऊन वधू-वरांना त्याच दिवशी सर्व बायोडाटा नोंदणीची पीडीफ यादी देण्याचाविचार असुन वेबसाईट ला नोंदणी करणार आहोत आहे. मेळाव्याच्या दोन्ही ठिकाणी देखील नाव नोंदणी करता येईल. यामेळाव्यात अहमदनगर, नाशिक, पुणे, बीड, मुंबई, औरंगाबाद अशा अनेक विविध जिल्ह्यातील वधु-वर उपस्थित राहणारआहेत.

या मेळाव्यामध्ये अनुरूप वधू-वरांना त्यांची ओळख, माहिती सांगून आपल्या जोडीदाराबद्दल असणार्‍या अपेक्षा व्यक्तकरता येणार आहेत. तसेच मराठा समाजाच्या उपवर वधू-वरांना त्यांच्या अपेक्षाप्रमाणे जोडीदार निवडता येणार आहे.

यामेळाव्या मध्ये वधूवरांनी स्वतःफोटो बायोडाटासह हजर राहावे. असे आवाहन सोयरीक ग्रृप चे सौ.रजनीताई गोंदकर, उद्योजकदिलीपराव वाकचौरे दत्तात्रय चव्हाण जनार्दन कदम व इतर यांनी केले आहे.

’व्हॉट्सअ‍ॅप’ वर जुळतात जेव्हा हजारो वधुवरांच्या सोयरीक’

महाराष्ट्र मराठा सोयरीक ग्रुपचा उपक्रम, हुंडा न घेण्याची अट, अनिष्ट रूढी परंपरेवरही होत प्रबोधन, समाज संघटन करण्यासमदत, हुंडा देणे घेणे तसेच अनिष्ट रूढी परंपराना फाटा देत मराठा समाजातील तरूण-तरूणींच विवाह मोफत जुळवुनदेण्यासाठी मराठा सोेयरीक व्हॉटसअ‍ॅप ग्रुपने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्रात 36 मराठा सोयरीकव्हॉटसअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत.

शिवाय या जिल्हा ग्रुपच्या अंतर्गत, तालुकानिहाय गुप तयार करून गेल्या तीनवर्षात हजारे विवाह जुळवुन आणले आहेत. सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर करत ही सामाजिक चळवळ जोमाने महाराष्ट्रातपसरत आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे गावापासुन दुर गेलेले सगे सोयरे, तसेच व्यावसायिक वधु – वर संस्थाच्या चलतीमुळेआपल्या मुला-मुलींचे विवाह जुळवितांना पालकांची चांगलीच कसरत होते. शिवाय धावपळ करूनही मनासारखे स्थळ मिळकतनसल्याची रूखरूख् असते.

वधु-वर पित्यांची हीच तळमळ आणि गरज लक्षात घेता अहमदनगर येथील जयकिसन वाघपाटीलयांनी दि. 31/05/2016 रोजी समाजातील लोकांना एकत्रीत आणण्यासाठी मराठा सोयरीक व्हॉटअ‍ॅप ग्रुपची निर्मीती केली.

मोफत चालते काम

अलीकडच्या काळता व्यावसायिक संस्था, मंडळ आणि व्यक्तींची संख्या वाढलेली आहे. त्यांच्याकडुन भयकंर लुटहोते. शिवाय विश्‍वासर्हतेचा प्रश्‍नही असाते.

या गोष्टींना आळा घालण्यासाठी मराठा सोयरीक व्हॉटसअ‍ॅप ग्रुपची संकल्पना पुढेआली या ग्रुपवर पालक विवाह योग्य मुलामुलींचे परिचय पत्र टाकतात. त्यानंतर त्यांच्या आवडी तसेच पसंतीनुसार थेट सबधितउपवर वधुच्या पित्यांशी संपर्क साधला जातो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment