PF Passbook : एका मिनिटात मोबाईलमध्ये डाऊनलोड करा तुमचे पीएफ पासबुक ! वाचा स्टेप बाय स्टेप माहिती

Ajay Patil
Published:
a

 सरकारी नोकरी तसेच बऱ्याच प्रकारच्या खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या नोकरदार व्यक्तींच्या मासिक पगारातून काही ठराविक रक्कम ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या माध्यमातून कापली जाते. कारण ही पीएफची रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्यकालीन जीवनासाठी खूप महत्त्वाचे असते. ही रक्कम प्रत्येक महिन्याला पगारातून कट होत असल्यामुळे ती कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ अकाउंट मध्ये गोळा होत असते. या अकाउंटचा प्रत्येक कर्मचाऱ्यांचा वेगवेगळ्या नंबर असतो त्यालाच युनिव्हर्सल अकाउंट नंबर अर्थात यु ए एन नंबर असे म्हटले जाते.

परंतु प्रत्येक महिन्याला कट होत असलेली ही रक्कम नेमकी किती जमा झाली हे कर्मचाऱ्यांना माहिती असणे खूप गरजेचे असते. त्यामुळे या लेखामध्ये आपण तुमचे असलेले ईपीएफ पासबुक तुमच्या हातातील मोबाईलच्या माध्यमातून कसे डाउनलोड करावे? त्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला तुमच्या ईपीएफ खात्यातील जमा झालेली रक्कम कळू शकेल व तुम्ही या बाबतीत अपडेट राहू शकतात. तसेच तुम्हाला तुमच्या ईपीएफ पासबुकचे ई स्टेटमेंट देखील एका मिनिटाच्या आत डाउनलोड करता येते. यासंबंधीची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

 मोबाईल मध्ये पीएफ पासबुक डाऊनलोड करण्यासाठी वापरा या स्टेप

1- याकरिता सर्वप्रथम तुम्हाला ईपीएफ इंडिया या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाणे गरजेचे आहे.

2- या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड आणि कॅपच्या कोड टाकून लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

3- लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमचे पासबुक पाहण्यासाठी मेंबर आयडी सिलेक्ट करणे गरजेचे आहे. तुम्ही ज्या ठिकाणी काम करतात त्या साठीचा हा मेंबर आयडी असतो.

4- त्यानंतर पासबुक पीडीएफ फॉरमॅट किंवा पीडीएफ डाउनलोड हा पर्याय त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो.

5- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला ईपीएफ पासबुक पीडीएफ डाउनलोड करता येते.

6- समजा एखाद्या वेळेस जर तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंटचा  पासवर्ड विसरला तर तुम्हाला पासवर्ड रिसेट करण्याकरिता अधिकृत वेबसाईटवर जाणे गरजेचे आहे.

या पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमचे पीएफ पासबुक डाऊनलोड करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe