अहमदनगर ब्रेकिंग : गरोदर महिलेचा कोरोना तपासणी दरम्यान मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- अकोले तालुक्यात राहणार्‍या एका पाच महिन्याच्या गरोदर महिलेस कोरोना तपासणी करण्यासाठी अहमदनगर शहरात आणले असता. तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दरम्यान या महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला आहे. याची अद्याप डॉक्टरांना खात्री पटलेली नाही. त्यामुळे, तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला नाही.

हा प्रकारामुळे, तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये तसे अन्य अफवा पसरवू नये. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धुमाळवाडी व नवलेवाडी ही दोन्ही गावे शेजारी शेजारी आहे. यांचे आरोग्य राखण्याचे काम म्हाळादेवी आरोग्य विभागाच्या अंतर्गत येते.

या कर्मचार्‍यांनी संबंधित महिलेस थोडा त्रास होत असल्यामुळे सोमवारी रात्री कोरोना, सारी व अन्य तपासणीसाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात नेले होते. दरम्यान तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते.

मात्र, मंगळवारी सकाळी या महिलेचा अचानक मृत्यु झाला आहे. ही महिला पाच महिन्यांची गरोदर होते. तर तिला पुर्वीपासून अस्ममाचा विकार होता अशी माहिती वैद्यकीय अधिक्षकांकडून मिळाली आहे.

दरम्यान सोमवारी रात्री तिच्या कोरोना तपासणीसाठी काही नमुने घेतले होते. त्यानंतर आज तिचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचे देखील सागितले जाते. मात्र, अचानक या महिलेला मृत्युला सामोरे का जावे लागले याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment