Top 10 Mutual Funds : टॉप 10 म्युच्युअल फंड योजना, गेल्या तीन वर्षांपासून देत आहेत बंपर परतावा !

Published on -

Top 10 Mutual Funds : कमी वेळात जास्त परतावा मिळवण्याच्या हेतूने लोकं म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. येथील गुंतवणूका जरी जोखमीच्या असल्या तरीदेखील त्या लोकप्रिय आहेत. गेल्या काही काळापासून यामध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार वेगाने वाढत आहेत, अशातच आज आम्ही तुम्हाला अशाच काही म्युच्युअल फंड योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी गेल्या तीन वर्षात चांगला परतावा दिला आहे. या योजनांनी 50 टक्के परतावा दिला आहे. जर तुम्ही या योजनांमध्ये गुंतवणूक केली असती तर तुमचे पैसे 3 वर्षांत दुप्पट झाले असते.

म्युच्युअल फंडच्या टॉप 10 योजना :-

-क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा देत आहेत. या योजनेने गेल्या 3 वर्षांत दरवर्षी सरासरी 54.90% परतावा दिला आहे. येथे तुम्ही 3 वर्षापूर्वी गुंतवणूक केली असती तर तुम्हाला येथे चांगला परतावा मिळाला असता.

-अशीच एक योजना क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर जिने गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 3 वर्षांत दरवर्षी सरासरी 50.20% परतावा दिला आहे.

-निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेने देखील गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा दिला आहे. या योजनेने गेल्या 3 वर्षात दरवर्षी सरासरी 48.14% परतावा दिला आहे.

-ICICI प्रुडेन्शियल कमोडिटीज म्युच्युअल फंड योजना गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा देत आहे. या म्युच्युअल फंड योजनेने गेल्या ३ वर्षात दरवर्षी सरासरी 46.02 टक्के परतावा दिला आहे. येथे गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरले असते.

-HSBC स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 3 वर्षात दरवर्षी सरासरी 45.86% परतावा दिला आहे. ही गुंतवणूक देखील तुमच्यासाठी फायद्याची ठरली असती.

-एचडीएफसी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना गेल्या ३ वर्षांपासून चांगला परतावा देत आहे. या योजना गेल्या 3 वर्षात दरवर्षी सरासरी 45.16% परतावा देत आहेत.

-ICICI प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा दिलाआहे. या म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 3 वर्षात दरवर्षी सरासरी 44.30% परतावा दिला आहे.

-कॅनरा रोबेको स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा देत आहे. या म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 3 वर्षात दरवर्षी सरासरी 43.72% परतावा दिला आहे.

-टाटा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा देत आहे. या म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 3 वर्षात दरवर्षी सरासरी 43.61% परतावा दिला आहे.

-ICICI प्रुडेन्शियल स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने चांगला परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 3 वर्षांत दरवर्षी सरासरी 43.52 टक्के परतावा दिला आहे.

टीप : येथील गुंतवणूका जोखमीच्या गुंतवणुका आहे, येथे गुंतवणूक करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला घ्यावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News