अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्याच्या महसूल सीमा हद्दीमध्ये दररोज पेट्रोल आणि एलपीजी इंधन विक्री वेळ वाढविण्यात आली आहे.
आता सकाळी ०५ ते सायंकाळी ०५ अशी विक्रीची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
डिझेल विक्री पूर्वीप्रमाणेच २४ तास सुरु राहील. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन वगळता सार्वजनिक सोईसुविधांच्या अनुषंगाने पेट्रोल आणि एलपीजी इंधन विक्रीची वेळ वाढविण्यात आली आहे.
कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार
दंडनिय/ कायदेशीर कारवाईस आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®