बुद्ध पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

Ahmednagarlive24
Published:

मुंबई, दि. 6 : भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाच्या विचारांमध्येच अखिल मानवजातीचं कल्याण सामावलं आहे.

हे विचारच मानवाचं जीवन अखंड प्रकाशमय करत राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान गौतम बुद्धांना अभिवादन केलं असून सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्धांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री म्हणाले की, समाजातील दु:ख, अज्ञान, अन्याय, अहंकार दूर व्हावा यासाठी भगवान बुद्धांनी अलौकिक कार्य केलं.

अखिल मानवजातीला त्यांनी अहिंसेचा, दयेचा, करुणेचा संदेश दिला. आज जगावर कोरोनाचं संकट आलं असताना अखिल मानवजातीला वाचवण्यासाठी एकत्र आणून सलोखा,

सहकार्याचं वातावरण निर्माण करण्याची ताकद भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये आहे. भावी पिढीला जगण्यासाठी आदर्श वातावरण देण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार मार्गदर्शक ठरतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment