शेतकऱ्याने बनवले जुगाड करून फवारणी यंत्र! 50 एकरची फवारणी होईल एका दिवसात

Ajay Patil
Published:
sprey machine

शेतीची अनेक कामे ही खर्चिक आणि वेळखाऊ असतात. बऱ्याच कामांना मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता भासते व त्यामुळे आधीच मजूर टंचाईची समस्या असल्यामुळे मजूर वेळेवर मिळत नाही आणि शेतीची महत्त्वाची कामे देखील वेळेवर पूर्ण होणे अशक्य होऊन जाते. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे मजुरी वरचा खर्च वाढतो तो वेगळाच.

अशा कामांची यादी पाहिली तर यामध्ये रोग व किडींच्या नियंत्रणाकरिता आपण पिकांवर जी काही फवारणी करतो हे देखील एक वेळ खाऊ आणि खर्चिक असे काम आहे. पिकांना फवारणी करणे तर गरजेचे असतेस परंतु यासाठी मजुरांची आवश्यकता भासते. त्यामुळे मजूरी वरचा खर्च वाढतो आणि कामाचा कालावधी देखील वाढतो.

परंतु आता यांत्रिकीकरणाच्या या युगामध्ये फवारणी करता देखील वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे विकसित करण्यात आलेली आहेत. परंतु काही  यंत्रांच्या किमती या जास्त असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला घेणे ते परवडत नाही व अशा शेतकऱ्यांमधूनच काही शेतकरी  हे वेगवेगळे प्रयोग किंवा प्रयत्न करून शेतीला आवश्यक असलेले यंत्रे जुगाड करून तयार करतात. अशाच पद्धतीचे एक फवारणी यंत्र  प्रकाशा या ठिकाणाचे कमलेश चौधरी या शेतकऱ्याने तयार केले असून यामुळे फवारणी वरील वेळ आणि खर्च दोन्ही वाचू शकणार आहेत.

 कमलेश चौधरी यांनी बनवले फवारणी यंत्र

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील कमलेश अशोक चौधरी यांचे शिक्षण कृषी क्षेत्रात झालेले असून त्यांनी नोकरी न मिळाल्यामुळे घरची शेती करायला सुरुवात केली. परंतु शेती करत असताना त्यांना मजुरांची समस्या दिसून आली. तसेच अनेक महत्त्वाच्या गोष्टींच्या भावामध्ये देखील वाढ झाल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत हे देखील त्यांनी पाहिले. या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी घरी असलेल्या टाकाऊ वस्तु पासून 27 फूट रुंदी असलेले स्प्रे बूम मशीन फवारणी यंत्र बनवले आहे.

या फवारणी यंत्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या मदतीने एका दिवसाला 50 ते 60 एकर क्षेत्रावर देखील फवारणी करता येणे शक्य झाले आहे. एका एकरची फवारणी फक्त पंधरा ते वीस मिनिटात आता शक्य होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. बरेच शेतकरी साध्या स्प्रे पंप किंवा बॅटरी चलीत पंपांच्या माध्यमातून फवारणी करतात. परंतु याला बऱ्याच प्रकारच्या मर्यादा देखील आहेत. तसेच वेळ देखील खूप खर्च होतो.

या सगळ्या समस्यावर उपाय म्हणून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती जमा केली व त्या आधारे फवारणीसाठी लागणारे  साहित्य घेतले व फवारणी मशीन विकसित केले. महत्वाचे  म्हणजे केवळ आठ दिवसांच्या काळात त्यांनी हे यंत्र तयार केले असून या यंत्राचे प्रात्यक्षिक घेतल्यानंतर प्रति एकर पंधरा ते वीस मिनिटांचा कालावधी त्यांना लागला. लहान शेतकऱ्यांसाठी हे फवारणी यंत्र खूप महत्त्वाचे ठरणार आहे. या स्प्रे बूम मशीनच्या माध्यमातून आता वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

 अशा पद्धतीने बनवले स्प्रे बुम मशीन

याकरिता त्यांनी एक ट्रॅक्टरचे मोठे टायर काढून घेतले व त्या जागी 18mm व चार एम एमचे चार इंच जाड असे मोठे टायर ट्रॅक्टरला बसवले. तसेच याला मागच्या बाजूला पंप बसवला व ट्रॅक्टरच्या पुढील बाजूला 27 फूट रुंदीचे फवारणी यंत्र बसवून ते ट्रॅक्टरला जोडून हे फवारणी यंत्र तयार केले.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe