Inspirational Story: तरुण उद्योजकाची कमाल! सुरू केलेल्या स्टार्टअपने 6 महिन्यात कमावले तेराशे कोटी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Inspirational Story:  भारतामध्ये सध्या अनेक नवनवीन प्रकारचे स्टार्टअप सुरू करण्यात येत असून अनेक तरुण आता स्टार्टअपची सुरुवात करत आहेत. बऱ्याच तरुणांमध्ये अनेक अंगभूत कौशल्य आणि गुण असतात. अलौकिक बुद्धिमत्तेच्या जोरावर असे तरुण त्यांचे स्वतःच्या नवनवीन कल्पना या सत्यात उतरवण्याकरिता स्टार्टअप ची सुरुवात करतात व प्रचंड मेहनतीच्या जोरावर ते यशस्वी होतात.

भारतामध्ये असे अनेक तरुण उद्योजक सांगता येतील की त्यांनी स्टार्टअप सुरू करून आज ते मोठ्या उद्योजकांच्या यादीत जाऊन बसले आहेत. अशाच उद्योजकांच्या यादीत स्टार्टअप च्या माध्यमातून पोहोचलेले नाव म्हणजे मनीष डबकारा हे होय. या लेखांमध्ये आपण त्यांनी मिळवलेल्या यशाची कहाणी बघणार आहोत.

 मनीष डबकारा यांची यशाची कहाणी

मनीष डबकारा हे नाव आता मोठ्या उद्योजकांच्या यादीत घेतले जात असून मध्य प्रदेश राज्यातील हे सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. मनीष हे एनकिंग इंटरनॅशनल इकेआय एनर्जीस नावाची कंपनी चालवत असून ही कंपनी प्रामुख्याने पर्यावरण क्षेत्रामध्ये मोलाचे काम करत आहे.

जर त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ याठिकाणी इंजिनिअरिंग पूर्ण केली व पुढील शिक्षण त्यांनी इंदोर मधून पूर्ण करत एमटेक ची पदवी घेतली. सन 2023 मध्ये मनीष डबकारा हे देशातील तेराव्या क्रमांकाचे सेल्फमेड श्रीमंत व्यक्ती असून मोठ्या कष्टाने त्यांनी हे स्थान प्राप्त केले आहे. मनीष हे ईकेआय एनर्जी सर्विसेस लिमिटेड या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असून पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करणारे या कंपनीचे 2500 पेक्षा जास्त कार्पोरेट क्लायंट आहेत. यापैकी बरेच क्लायंट हे रिन्यूएबल एनर्जी कंपन्या आहेत व त्यांचे सुमारे 70 टक्के प्रकल्प हे भारतातच आहे.

 त्यांच्या कंपनीने सहा महिन्यांमध्ये केली तेराशे कोटींची कमाई

त्यांच्या कमाई बाबत जर विचार केला तर एका मीडिया रिपोर्टनुसार या तरुण उद्योजकाने फक्त सहा महिन्यांमध्ये एक हजार तीनशे कोटी रुपयांची संपत्ती मिळवली होती व सध्याची त्यांची संपत्ती तीन हजार सातशे कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. ते इंदोर मधील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक असून  त्यांच्या कंपनीचे शेअर्स एप्रिल 2021 मध्ये शेअर बाजारात लिस्ट झाले होते तेव्हा त्यांच्या शेअरची किंमत चाळीस रुपये होती.

परंतु आजमीतिला त्यांच्या शेअरची किंमत बाजारामध्ये साडेचारशे रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना त्यांच्या कंपनीने दोनच वर्षांमध्ये दहापटीचा परतावा दिला आहे. परंतु त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा 74 टक्के हिस्सा या कंपनीत आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मनीष हे सर्टिफाइड एनर्जी ऑडिटर देखील आहेत.

त्यांनी अहमदाबाद आणि इंदूर येथील आयआयएम सर्टिफिकेशन केल आहे. त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी मधील मास्टर डिग्री देखील असून ते एक क्लायमेट ऍक्टिव्हीस्ट म्हणून देखील काम करत आहेत. वयाच्या फक्त 25 व्या वर्षी त्यांनी ही कंपनी सुरू केली व आज त्यांच्या कंपनीचे 40 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये 3000 पेक्षा जास्त क्लाइंट आहेत.