ZP Pune Recruitment 2023 : पुण्यात नोकरी शोधताय?; 10 वी पास ते पदवीधरांना उत्तम संधी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ZP Pune Recruitment 2023 : जर तुम्ही पुण्यात असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. कारण सध्या जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गाची विविध विभागाकडील सरळसेवेने पदे भरली जाणार असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

येथे विविध पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता देखील गरजेची आहे. जे उमेदवार पात्र व उत्सुक आहेत त्यांनी ताबडतोड येथे अर्ज सादर करावेत, चला या भरती विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया-

रिक्त जागा

या भरती अंतर्गत आरोग्यसेवक (पुरुष), आरोग्यसेवक (महिला), ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, लिपिक, मुख्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रिंगमन, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (शिक्षण), जोडारी व इतर सर्व पदे भरली जाणार आहेत. तरी जे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

येथे नोकरी करण्यास इच्छुक असलेला उमेदवार 10वी, 12वी, पदवीधर तसेच इतर सर्व शैक्षणिक पात्रता असलेला असावा.

नोकरी ठिकाण

ही भरती सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणीं होत आहे. तरी जाहिरात बघून येथे अर्ज सादर करावेत.

मासिक वेतन

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 24,500 ते 81,100 रूपये मासिक पगार दिला जाणार आहे.

रिक्त पदे

जिल्ह्यांनुसार वेगवेगळी संख्या असेल.

अर्ज पद्धती

अर्जदारांनी लक्षात घ्या येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जातील.

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रूपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900 रूपये इतके शुल्क असतील.

अर्ज सुरू

आजपासून म्हणजेच 05 ऑगस्ट 2023 पासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे. या तारखेनंतर कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

निवड प्रक्रिया

संगणक प्रणाली व्दारे लेखी परीक्षा जिल्हा स्तरावर आयोजीत करण्यात येईल.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 पुर्ण झालेले असावे.

भरती कालावधी

येथे कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची संधी आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी ही संधी सोडू नये.

ऑनलाईन अर्जाची लिंक

येथे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी, आणि मगच अर्ज सादर करावा.