NCL Pune Bharti 2023 : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत भरती सुरु; येथे करा अर्ज

Sonali Shelar
Updated:
Pune Bharti 2023

Pune Bharti 2023 : पुण्यात नोकरी शोधताय? तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. जे उमेदवार सध्या पुण्यात नोकरी शोधत आहेत, त्यांच्यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथे नोकरीची संधी आहे. यासाठीची भरती अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार असून, यासाठी अर्ज करण्याची शेवटची शेवटची तारीख 10, 16, 17 व 19 ऑगस्ट 2023 (पदांनुसार) आहे. या भरती विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा…

पदांची नावे आणि रिक्त जागा

ही भरती प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असोसिएट-II, प्रोजेक्ट असोसिएट-III, वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट सायंटिस्ट-III, रिसर्च असोसिएट (RA) पदांसाठी होत असून या भरती अंतर्गत एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज सादर करावेत.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे होत असून, इच्छुक उमेदवारांनी ताबडतोब येथे अर्ज सादर करावेत.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्यासाठी 35 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

वरील भारतीकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 10, 16, 17 व 19 ऑगस्ट 2023 (पदांनुसार) आहे.

निवड प्रक्रिया

येथे उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे (ऑनलाईन) होणार आहे.

अधिकृत वेबसाईट

या भारतीविषयी जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही www.ncl-india.org या वेबसाईटला भेट देऊ शकता.

असा करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-उमेदवार http://jobs.ncl.res.in/ या संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात.
-लक्षात घ्या अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत. दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
-लक्षात घ्या येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10, 16, 17 व 19 ऑगस्ट 2023 (पदांनुसार) आहे. देय तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe