अहमदनगर Live24 ,6 मे 2020 :- राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर परिसरात सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी मुस्कान रेहान शेख , वय २० हिचा सासरी नांदत असताना सासरच्या लोकांनी माहेरुन क्रूझर गाडी घेण्यासाठी १ लाख रुपये घेवून ये तसेच गर्भपात केला तरच तुला घरात घेऊ ,
अशी धमकी देवून तिचा नवरा आरोपी रेहान शेख याचे बाहेरख्याली संबंध पत्नी फिर्यादी मुस्कान हिला माहीत झाले कारणावरुन वेळोवेळी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी देवून शारीरिक व मानसिक छळ केला.
वरीलप्रमाणे पिडीत विवाहित तरुणी मुस्कान रेहान शेख हिने लोणी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी नवरा रेहान हमीद शेख , सासरा हमीद गुलाब शेख , सासू नाजमीन हमीद शेख दीर अदनान हमीद शेख , दीर नुमान तय्यब शेख , सासू रेश्मा तय्यम शेख , चुलत सासरा तय्यब गुलाब शेख , चुलर सासरा रज्जाक गुलाब शेख सर्व रा कोल्हार बु . भगवतीपूर यांच्याविरुद्ध भादवि कलम ४९८ ( अ ) ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुरनं . २३७ दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®