अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करू नये, अशी मागणी येथील आण्णासाहेब कोते यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत पत्रकात शेतकऱ्यांनी म्हटले, की राज्यात सप्टेंबर ऑक्टोबर २०२२ रोजीच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. शासनाने नुकसानभरपाई जाहीर करूनही विलंब झाला.

त्यामुळे पुणतांबा मंडळामधील वाकडी परिसरातील शेतकऱ्यांनी यासाठी उपोषण केले. तहसीलदार मोरे यांच्या आश्वासननंतर उपोषण मागे घेतले. त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे; मात्र ही रक्कम काही शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होत आहे.
सध्या पेरणी होऊनही पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पेरणी केलेली पिके येण्याची खात्री नसल्याने शेतकरी प्रचंड नुकसानीच्या सावटाखाली आहे. त्यामुळे सर्वच बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाईची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करू नये.
अशी मागणी वाकडी येथील आण्णासाहेब कोते, विठ्ठल शेळके, भाऊसाहेब लहारे, दिपक वाघ, वसंत डोखे, शेखर लहारे, श्रीकांत शेळके, नानासाहेब कोते, निलेश कोते, सचिन शेळके, जालिंदर कोते, गणेश आहेर, मच्छिद्र दळे, मुनीर शेख, जाकीर शेख, प्रभाकर एलम, पोपट पानसरे, प्रमोद एलम, किशोर एलम, कैलास पानसरे, गोरक्षनाथ नारंगिरे, वाल्मिक लहारे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.