राहुरी : राहुरी – शनिशिंगणापूर फाटा येथे बोलेरो आणि कंटेनरचा भीषण अपघात असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांना राहुरीकडून बोलेरा (एमएच १२, के-५९५१) पुण्याच्या दिशेने जात होती. यावेळी राहुरी खुर्द जवळील फाट्यानजीक वेगात असणारी बोलेरो दुभाजकाला आदळून पलटी होत विरुध्द दिशेला गेली. त्यामुळे राहुरीकडे येणा-या ट्रकवर बोलेरो आदळली.

बोलेरोमधील तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. तिघांनाही अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अद्याप नावे कळालेली नाहीत.अपघाताची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, बाभळेश्वर येथील पोलिस मदत केंद्रातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
- डी-मार्टची फ्रँचायझी मिळते का? जाणून घ्या संपूर्ण सत्य आणि भागीदारीची संधी
- फक्त ‘या’ महिलांनाच मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता; केवायसी अपूर्ण, चुकीची असल्यास पैसे अडकणार
- पुणे पोलीस भरतीला अखेर हिरवा कंदील; फेब्रुवारीत मैदानी चाचणी, शहराच्या सुरक्षेला मिळणार बळ
- प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- मासिक ८० हजार पगारात ५० लाखांचे घर शक्य आहे का? आर्थिक तज्ज्ञांचा स्पष्ट इशारा













