Versova-Dahisar Sea Way : 6 हजार कोटींचा हा सागरी मार्ग होणार लवकर पूर्ण! निविदा प्रक्रियेला सुरुवात

Ajay Patil
Published:
versova-dahisar sea way

Versova-Dahisar Sea Way :- मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी याकरिता अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून या माध्यमातून वाहतुकीच्या गतिमान सुविधा निर्माण व्हाव्या व प्रवाशांचा वेळ वाचावा या दृष्टिकोनातून या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या प्रकल्पांमध्ये अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून प्रकल्प खर्च देखील अफाट आहे.

यामध्ये वांद्रे- वरळी सी लिंक आणि वर्सोवा- दहिसर हे दोन सागरी प्रकल्प खूप महत्त्वाचे आहेत. त्यातील वर्सोवा ते दहिसर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून मुंबई सागरी मार्गाचा हा एक पुढचा टप्पा आहे. याकरिता आता निविदा प्रक्रिया मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.

 वर्सोवादहिसर सागरी मार्गासाठी 16000 कोटींचा प्रस्ताव

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई सागरी महामार्गाचा पुढील टप्पा म्हणजेच वर्सोवा ते दहिसर सागरी मार्ग असून या कामाकरिता मुंबई पालिकेकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे व या प्रकल्पासाठी तब्बल 16000 कोटींचा प्रस्ताव आहे. जर आपण या प्रकल्पाचा विचार केला तर याचे काम सहा टप्प्यांमध्ये पूर्ण केले जाणारा असून या प्रत्येक टप्प्यांकरिता स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवली जात आहे.

 या सागरी मार्गाचे महत्त्वाचे टप्पे खर्च

1- वर्सोवा ते बांगुर नगर साडेचार किलोमीटर अंतराचा एकूण या टप्प्याचा खर्च आहे 2593 कोटी

2- बांबू नगर ते माईंड स्पेस मालाड हा 1.66 किलोमीटरचा आणि गोरेगाव ते मुलुंड जोडरस्ता हा 4.4 किलोमीटरचा याचा एकूण खर्च आहे 2910 कोटी

3- माईंड स्पेस मालाड ते चारकोप हा 3.9 किलोमीटर याचा एकूण खर्च 2910 कोटी

4- चारकोप ते माईंड स्पेस मालाड( दक्षिणेकडील बोगदा) 3.9 किलोमीटर अंतराचा यासाठीचा एकूण खर्च आहे 2911 कोटी रुपये

5- चारकोप ते गोराई हा 3.8 किलोमीटर अंतराचा एकूण खर्च 2290 कोटी रुपये

6- गोराई ते दहिसर हा 3.7 किलोमीटर अंतराचा याचा एकूण खर्च 2612 कोटी

अशाप्रकारे हा सागरी मार्ग सहा टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नक्कीच मुंबईकरांना वाहतुकीच्या दृष्टिकोनातून खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe