‘त्यांना बिअरऐवजी मिळाला लाठीचा प्रसाद !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :-राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात नगर मनमाड मार्गावर बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बियरची वाहतूक  करणारा  आयशर टेम्पो पलटी झाल्याने तळीरामांची चंगळ झाली.

परंतु, वेळीच पोलिस दाखल झाल्याने बियर मिळण्याऐवजी लाठीचा प्रसाद मिळाला. नगरवरून कोल्हारच्या दिशेने जात असलेला आयशर टेम्पो मधुन बियरची वाहतुक करणाऱ्या टेम्पोचा टायर फुटल्याने टेम्पो रस्त्यावर पलटी झाला.

या घटनेची माहिती  वाऱ्यासारखी पसरताच तळीरामांनी बियरच्या बाँटल गोळा करण्यासाठी एकच गर्दी केली. जाणाऱ्या येणाऱ्या  प्रवाशांसह स्थानिकांनी बियरच्या बाँटल गोळा करुन  घरी नेल्या.

लॉगडाऊन काळात बियरबार व शॉपी बंद होत्या मंगळवारी काही वेळ वाइन शॉप खुले झाले पण गर्दी लक्ष्यात घेता प्रशासनाने लागलीच सील केले. मात्र आज बियरचा टेम्पो प्लटी झाल्याने गुहा परिसरातील अनेकांनी हात मारला

त्यामुळे बियरच्या बाटल्या लुटण्याचा  आनंद त्यांच्या चेहऱ्यावर बघण्यासारखा होता. दरम्यान चालक व क्लिनर यांना जमा झालेल्या गर्दीला अवरावे कसे असा प्रश्न पडला

पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याने बियरच्या बाँटल नेण्यास आलेल्या अनेकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला.

अनेकांना बियर न मिळाल्याने हिरमोड झाला.पोलिसांनी गर्दीस पांगवून बियरच्या बाँटल गोळा करण्यास मजुर लावून टेंपोत भरला.

त्यानंतर टेम्पो चालक व क्लिनर यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान लॉक डाऊन मध्ये मद्य शौकिनांची चंगळ झाल्याने. तळीरामांनी  उपरवाला देता है तो छप्पर फाडके अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment