अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- राहुरी तालुक्यातील गुहा येथे प्राजक्ता ओहोळ या २० वर्षांंच्या नवविवाहितेने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
साकूर मांडवे माहेर असलेल्या प्राजक्ताचे वर्षभरापूर्वी गुहा येथील अविनाश याच्याशी विवाह झाला होता.
याप्रकरणी राहुरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आली.
या घटनेची खबर मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्राजक्ताचा मृतदेह ताब्यात घेतला.
राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता प्राजक्ता मृत झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली.
बुधवारी दुपारी राहुरी येथे शवविच्छेदनानंतर प्राजक्ताचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
प्राजक्ताच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®