यामध्ये आपण सर्वजण जेव्हा टीव्ही पाहिला बसतो तेव्हा प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. परंतु टीव्हीचा रिमोट ज्याच्या हातात असतो तोच त्या टीव्हीचा मालक त्या वेळेपर्यंत होऊन बसतो. ही परिस्थिती सर्वच घरांमध्ये दिसून येते. परंतु जर टीव्हीचा रिमोट खराब झाला किंवा रिमोट हरवला तर मग काय? तेव्हा खूप मोठ्या समस्या निर्माण होतात. कारणच प्रत्येक वेळेस उठून चॅनेल बदलणे किंवा आवाज कमी जास्त करणे याचा प्रत्येकालाच कंटाळा येतो.
पण रिमोट व्यतिरिक्त जर तुमच्या हातातील स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही टीव्ही नियंत्रित करू शकलात तर किती उत्तम होईल. म्हणजेच तुमचा स्मार्टफोन हा रिमोट चे काम करेल. परंतु कसे? काय आहे त्याची प्रोसेस? हे देखील माहिती असणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने आपण या लेखांमध्ये याबद्दलची माहिती घेणार आहोत.
अशा पद्धतीने तुमचा स्मार्टफोनचा वापर करा रिमोटप्रमाणे
याकरिता गुगल टीव्ही ॲप तुम्हाला डाऊनलोड करणे गरजेचे असते. एप्लीकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या हातातील स्मार्टफोनच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकतात. या माध्यमातून तुम्ही टीव्हीचा आवाज कमी जास्त तसेच चॅनल सर्फ देखील करू शकतात. तुमच्याकडे असलेल्या अँड्रॉइड किंवा आयफोन स्मार्टफोन मध्ये तुम्ही गुगल टीव्ही ॲप सेट करून त्याचा रिमोट प्रमाणे वापर करू शकतात.
अँड्रॉइड मोबाइलसाठी
1- याकरिता सर्वात अगोदर तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वर जाऊन गुगल टीव्ही ॲप इंस्टॉल करणे गरजेचे आहे.
2- त्यानंतर तुमच्या घरातील टीव्ही आणि फोन हे एकाच वाय-फाय नेटवर्कवर असल्याची खात्री करावी व तुमच्या टीव्हीमध्ये जर वाय-फायचे सुविधा नसेल तर तुम्ही तुमचा फोन आणि टीव्ही हे एकमेकांना ब्लूटूथच्या माध्यमातून कनेक्ट करू शकतात.
3- त्यानंतर गुगल टीव्ही ॲप ओपन करावे व हे ॲप ओपन झाल्यानंतर खालच्या कोपऱ्यामध्ये एक रिमोट बटन असते त्यावर क्लिक करावे.
4- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हे ॲप्लिकेशन संबंधित डिवाइसला स्कॅन करण्यास सुरुवात करते व यास स्कॅनिंगमध्ये तुमचा टीव्ही सर्च झाल्यानंतर तो सिलेक्ट करावा.
5- सिलेक्ट केल्यानंतर टीव्हीच्या स्क्रीनवर एक कोड दिसेल हाच कोड संबंधित एप्लीकेशन मध्ये एंटर करावा आणि पेजवर क्लिक करावे.
6- अशा पद्धतीने तुमचा फोन तुमच्या टीव्हीला कनेक्ट झाला की नेहमीच्या रिमोट प्रमाणेच तुम्ही स्मार्टफोनच्या साह्याने टीव्ही कंट्रोल करू शकतात.
तुमच्याकडे आयफोन असेल तर आयफोनच्या माध्यमातून
1- याकरता देखील तुमचा आयफोन आणि टीव्ही एकच वायफाय नेटवर्कला कनेक्ट असल्याची खात्री करून घ्यावी.
2- ॲप स्टोअर वरून गुगल टीव्ही ॲप डाऊनलोड करावी आणि ते इंस्टॉल करावे.
3- एप्लीकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आय फोन मध्ये गुगल टीव्ही ॲप ओपन करावे.
4- त्यानंतर हे ॲप ऑटोमॅटिक तुमचा टीव्ही सर्च करण्यास सुरुवात करेल. त्या सर्च मध्ये तुमचा टीव्ही सापडत नसल्यास डिव्हायसेस स्कॅन या बटणावर क्लिक करावे व पुन्हा प्रयत्न करावा.
5- टीव्ही सर्च झाल्यानंतर स्क्रीनवर येणारा कोड एंटर करावा व त्यानंतर पेअरवर क्लिक करून आयफोन टीव्ही ला कनेक्ट करावा.
त्या सोप्या पद्धतीने तुम्ही स्मार्टफोनच्या मदतीने टीव्ही नियंत्रित करू शकतात.