अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- दारू पिऊन त्रास देणाऱ्या सख्या भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारात बुधवारी रात्री घडलेल्या घटनेबाबत आज उलगडा झाला आहे.
सोन्याबापू दत्तात्रय दळवी (वय 22) हे मयत युवकाचे नाव आहे. त्याचा सख्खा भाऊ गणेश दत्तात्रय दळवी (वय 20) याने हा खून केला होता.
याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, सोन्याबाप दतात्रय दळवी (वय २२ वर्षे) हा नेहमी दारु पिऊन त्याची आई व भावाला नेहमी शिवीगाळ करुन मारण्याची धमकी देत होता.
बुधवारी रात्री सव्वाअकरा वाजता तो दारू पिऊन घरी आला होता. गणेश दतात्रय दळवी हा ‘तू आता झोप’, असे म्हणाला. सोन्याबापू हा त्याचे अंगावर मारण्यासाठी सुताचे दावे घेवुन गेला.
गणेश याने सोन्याबापू यास ढकलून देऊन हाताने चापट मारुन त्याचे हातातील सुती दाव्याने सोन्याबापू याचा गळा आवळून जिवे ठार मारले.
सुरुवातीला आत्महत्येचा बनाव केला. मात्र तपासात आज नवीन प्रकार उघडकीस आला. ही आत्महत्या नसून खून असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी गणेश दळवी याला अटक केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®