Flipkart Big Bachat Dhamaal : सध्या बाजारात 5G स्मार्टफोन लाँच होऊ लागले आहेत. या फोनमध्ये कंपन्या शानदार फीचर्स देत आहेत. त्यामुळे या स्मार्टफोनच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच जर तुम्ही स्वस्तात 5G स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे.
आता तुम्ही Samsung Galaxy M34 5G हा स्मार्टफोन अवघ्या 749 रुपयांना सहज खरेदी करू शकता. तुमच्यासाठी अशी भन्नाट संधी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. ज्याचा लाभ घेतला तर तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.
अवघ्या 749 रुपयात खरेदीची सुवर्णसंधी
किमतीचा विचार केला तर 8GB RAM आणि 6000mAh बॅटरीसह Samsung Galaxy M34 5G मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत खरेदी करता येत आहे. Samsung च्या या 5G स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट भरघोस सवलत देत आहे. या ठिकाणी हा स्मार्टफोन 19 टक्के डिस्काउंटसह म्हणजे 25,999 रुपयांऐवजी 20,999 रुपयांना लिस्ट केला आहे. अशाप्रकारे तुम्हाला या स्मार्टफोनवर एकूण 5000 रुपयांची सवलत दिली जात आहे.
Samsung Galaxy M34 5G एक्सचेंज ऑफर
जास्त सवलत मिळवण्यासाठी ग्राहकांना आता बँक आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येईल. तुम्हाला केवळ 749 रुपयांमध्ये Samsung Galaxy M34 5G खरेदी करण्यासाठी एक्सचेंज ऑफर लागू करणे गरजेची आहे. तसेच फ्लिपकार्टकडून या स्मार्टफोनवर 20,250 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट देण्यात येत आहे.
आता याचा पुरेपूर फायदा घेऊन मोठ्या सवलतीत स्मार्टफोन घरी नेऊ शकता. त्याशिवाय 10 टक्के सवलत निवडक कार्ड्ससह पेमेंट करून मिळेल. इतकेच नाही तर तुम्हाला ईएमआय पर्यायांतर्गतही सवलत मिळू शकते.
परंतु जर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला चांगल्या स्थितीत असणाऱ्या फोनची विक्री करावी लागणार आहे आणि तो नवीनतम मॉडेलच्या यादीत येतो. त्यानंतर सॅमसंगच्या स्मार्टफोनची किंमत 20,250 रुपयांपर्यंत कमी केली जाईल. असे झाले तर या फोनची किंमत फक्त 749 रुपये असेल.