विधानपरिषदेसाठी माजी आमदार शिवाजीराव कर्डिलेंना संधी द्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- माजी मंत्री, राहुरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने संधी द्यावी,

अशी मागणी राहुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

ना.फडणवीस व प्रदेशाध्यक्ष पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे नगर जिल्ह्यातील मातब्बर नेते आहेत.

गेल्या पंचवीस वर्षांत त्यांनी विकासाची कामे केली आहेत. मतदार संघातील जनतेशी नाळ जोडलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात लढण्याची क्षमता फक्त एकमेव कर्डिले यांची आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत कर्डिले यांना राजकीयदृष्ट्या कोंडीत पकडून काहींनी पराभव केलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप पक्ष मोठा करण्यासाठी तसेच असंख्य कार्यकर्ते व नागरिकांच्या मागणीचा विचार करून कर्डिले यांची विधानपरिषदेवर निवड करावी,

अशी मागणी राहुरी तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, युवा अध्यक्ष रवींद्र म्हसे, महिला आघाडीच्या अध्यक्षा, नगरसेविका नमिताताई शेटे, राहुरी शहराध्यक्ष राजेंद्र उंडे, युवा शहराध्यक्ष गणेश खैरे, अजित डावखर, उमेश शेळके आदींनी केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment