अहमदनगर एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या सर्व शाळांमध्ये ई लर्निंग सुरु विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- गुणवत्तापुर्ण शिक्षणासाठी संपुर्ण जिल्ह्यात आपली ओळख निर्माण केलेल्या अहमदनगर एज्युकेशन सोसायटीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉक डाऊन कालात आपल्या सर्व शाळांमध्ये ई लर्निंग सुरु केले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी ई लर्निंगसाठी पुढाकार घेतला आहे. कोरोनामुळे यावर्षी प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परिक्षा झाल्या नाहीत.

दीड महिन्यापासून विद्यार्थी घरीच बसून आहे. या सुट्टीचा योग्य उपयोग करुन घेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया व संस्थेचे खजिनदार प्रकाश गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग द्वारे अभ्यास घेण्यात येत आहे.

यासाठी संस्थेने विद्यार्थ्यांना नवनीतचे टॉप स्कोरर हे अ‍ॅप विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अ‍ॅपचा खर्च संस्थेने उचलला आहे.

संस्थेच्या शिर्डी, वांबोरी, पारनेर, भिंगार व नगर मधील सर्व शाखांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे. शिक्षक व विद्यार्थी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे.

संस्थेने सोशल मीडियाचा वापर अभ्यासासाठी करून एक नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे. सोशल मीडियाद्वारे प्रशिक्षण पद्धती प्रचलित होत आहे. नवनीत टॉप स्कोरर अ‍ॅपचे मॅनेजर नागेश ढसाळ व प्रवीण वाघमारे या उपक्रमास सहाय्य करत आहे.

सर्व शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग या उपक्रमासाठी परिश्रम घेत असून, हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी संस्था कार्यालयातील प्रज्ञा हुंडेकरी व अजित गोसकी प्रयत्नशील आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment