Best post office schemes : पोस्ट ऑफिसच्या काही विशेष बचत योजना; गुंतवणूकीवर मिळेल दुप्पट परतावा !

Sonali Shelar
Published:
Best post office schemes

Best post office deposit schemes : देश आज स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे, आजच्या या खास दिवशी आम्ही तुमच्यासाठी काही उत्तम बचत योजना घेऊन आलो आहोत. आर्थिक दृष्ट्या स्वतः मजबूत करण्यासाठी बचत खूप महत्वाची आहे. अशा स्थितीत तुम्हाला बचत योजनांची माहिती असणे फार महत्वाचे बनते. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या काही खास योजनांबद्दल सांगणार आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता.

तुमच्या माहितीसाठी पोस्ट ऑफिसमध्ये जमा केलेल्या पैशाची हमी भारत सरकार देते. म्हणूनच ही गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, अशा परिस्थितीत तुम्ही येथे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही पोस्ट ऑफिसच्या काही प्रमुख ठेव योजनांची संपूर्ण माहिती देणार आहोत.

पोस्ट ऑफिसमधली एक उत्तम योजना म्हणजे, मासिक उत्पन्न योजना. याला सामान्यतः पोस्ट ऑफिस एमआयएस देखील म्हणतात. सध्या या योजनेवर 7.4 टक्के व्याज दिले जात आहे. MIS ही 5 वर्षांची ठेव योजना आहे, ज्यावर दरमहा व्याज दिले जाते. या योजनेत जास्तीत जास्त 9 लाख रुपये एकाच नावाने आणि 15 लाख रुपये संयुक्त नावाने जमा करता येतील. या योजनेत जमा केलेल्या पैशावर आयकर सवलत मिळत नाही आणि नियमानुसार मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरावा लागतो.

पोस्ट ऑफिसमध्ये टीडी म्हणजेच टाईम डिपॉझिट देखील आहे. हे 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांसाठी करता येते. एका वर्षाच्या TD वर 6.9 टक्के, 2 आणि 3 वर्षाच्या TD वर 7 टक्के आणि 5 वर्षाच्या TD वर 7.5 टक्के व्याज दिले जात आहे. 5 वर्षांच्या टीडीमध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये ठेवीवर आयकराच्या कलम 80C अंतर्गत आयकर सूट मिळू शकते. मात्र, व्याजावर नियमानुसार कर भरावा लागतो.

किसान विकास पत्रात जमा केलेले पैसे 115 महिन्यांत दुप्पट होतात. किसान विकास पत्र (KVP) मध्ये सध्या 7.5 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेत जमा केलेल्या पैशावर आयकर सवलत मिळत नाही आणि नियमानुसार मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरावा लागतो. जर तुम्ही उत्तम परताव्याची गुंतवणूक योजना शोधत असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम गुंतवणूक ठरेल.

पीपीएफवरही खूप चांगले व्याज दिले जात आहे. सध्या या योजनेवर 7.1 टक्के व्याज दिले जात आहे. ही योजना 15 वर्षांची आहे, ज्यामध्ये दरवर्षी पैसे जमा करावे लागतात. या योजनेत दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. आयकर कलम 80C अंतर्गत या ठेवीवर आयकर सूट मिळू शकते. याशिवाय, पीपीएफमध्ये पैसे जमा करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे योजना पूर्ण झाल्यावर मिळणारे व्याज पूर्णपणे आयकरमुक्त आहे.

याशिवाय सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेल्या पैशांवर आयकर सवलत मिळते. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या नावाने खाते उघडता येते. सध्या या योजनेत 8 टक्के व्याज मिळत आहे. ही 21 वर्षांची ठेव योजना आहे आणि मुलगी मोठी झाल्यावर संपूर्ण पैसे परत केले जातात. ही योजना मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करू शकता.

पोस्ट ऑफिसच्या आणखी एका चांगल्या योजनेचे नाव आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र. हे सामान्यतः NSC म्हणून ओळखले जाते. पोस्ट ऑफिस NSC वर सध्या 7.7 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेत 5 वर्षांसाठी पैसे जमा केले जातात. या योजनेत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करून, आयकर कलम 80C अंतर्गत सूट मिळू शकते. मात्र, या योजनेतून मिळणाऱ्या व्याजावर नियमानुसार आयकर भरावा लागतो.

पोस्ट ऑफिसच्या योजनांपैकी एक म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना. ही योजना 5 वर्षांसाठी आहे. सध्या येथे ठेवलेल्या पैशावर 8.2 टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेत आयकर सवलती उपलब्ध आहेत. येथे जमा केलेल्या पैशावर प्राप्तिकरात सूटही मिळते आणि या योजनेचे संपूर्ण व्याज देखील करमुक्त आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe