अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :- ऐन उन्हाळातच उपनगर मधील प्रभाग 1 ते 7 च्या नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.
तसेच महापालिकेने वॉलमन वाढवणे गरजेचे आहे. यावर पालिकेने आठ दिवसात तोडगा काढावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी दिला.
तसे निवेदन मनपा आयुक्त मायकलवार यांना दिले. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते,माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे,उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®