Ahmednagar News : तालुक्यातील जोर्वे गावात चॉकलेटमध्ये चक्क अळ्या व अंडे निघाल्याचे अशोक क्षीरसागर या जागरूक ग्राहकांमुळे नुकतेच उघडकीस आले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
जोर्वे गावातील अशोक क्षीरसागर यांनी एका किराणा या दुकानातून आपल्या पत्नीच्या वाढदिवसाला एका कंपनीचे सेलिब्रेशनचे दोन चॉकलेट पाकीटे खरेदी केली. त्याची एक्सपायरीची मुदत संपलेली नव्हती. पॅकेट घरी त्यामध्ये चक्क अळ्या व अंडे निघाली. त्यानंतर त्यांनी आणि तात्काळ दुकानदार यांच्याबरोबर संपर्क साधला. दुकानदाराने डिस्ट्रीब्यूटर कडे बोट दाखविले.
संगमनेर येथील डिस्ट्रीब्यूटर यांच्याबरोबर संपर्क साधला असता, त्यांनी चक्क उद्दामपणे विष खाऊन सुद्धा माणसाला काही होत नाही. तर सदर चॉकलेट खाल्ल्याने काही होणार नाही व मी काही घरी बनवत नाही, असे उत्तर दिले.
सदर ग्राहक अशोक क्षीरसाग व किराणा दुकानदाराच फोनवरून झालेला संवाद सोशल मीडियामध्ये सर्वत्र व्हायरल हो आहे. सदर ग्राहकांने औषध प्रशासन अधिकाऱ्यांबरोब संपर्क साधला असता, त्यांनी एक्सपायर झालेला माल. असेल तर व माल साठविण्याच्य प्रक्रियेमध्ये दोष असेल,
त असे होऊ शकते. सदर चॉकले ही एक्सपायर झालेली नव्हती त्यामुळे साठविण्याच्या प्रक्रियेमध्ये निश्चित राशि जमा या जो प्रसन दोष असू शकतो. ग्राहक अशोक क्षीरसागर यांनी संबधीत कंपनीकडे ऑनलाइन तक्रार केली आहे. ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने काल शुक्रवारी जोर्वे येथील संबधीत दुकानातून व डिस्ट्रिब्युटर या दोघांकडून नमुने घेण्यात आले आहे. ते तपासण्यासाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले असून दोषींवर अन्न सुरक्षा व मान दे कायद्याने दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल. – पी. पी. पवार, अन्न सुरक्षा अधिकारी.