Top 5 Share : एका महिन्यात पैसे दुप्पट करणारी भन्नाट स्कीम; जाणून घ्या…

Sonali Shelar
Published:
Top 5 Share

Top 5 Share : बऱ्याच काळापासून शेअर बाजारात मोठी घसरण होताना दिसत आहे, असे असतानाही अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. आज आपण अशाच शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी कालावधीत श्रीमंत केले आहे. या शेअर्सनी एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 142% पर्यंत परतावा दिला आहे.

सेन्सेक्स आणि निफ्टीवर नजर टाकली तर गेल्या एका महिन्यात त्यांचा परतावा सुमारे अडीच टक्के नकारात्मक राहिला आहे. शेअर बाजारानुसार ही मोठी घसरण आहे. पण त्यानंतरही टॉप 5 शेअर्सचे रिटर्न्स पाहण्यासारखे आहेत. चला जाणून घेऊया या टॉप 5 शेअर्सचा परतावा….

Innovative Idealsचा शेअर एका महिन्यापूर्वी 2.98 रुपयांवर ट्रेडिंग करत होता. मात्र आता या शेअरचा दर 7.23 रुपये झाला आहे. अशाप्रकारे या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या एका महिन्यातच 142.62 टक्के परतावा दिला आहे.

दुसऱ्या शेअरबद्दल बोललो तर, Asian Warehousingचा शेअर एक महिनाभरापूर्वी 11.57 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. मात्र आता या शेअरचा दर 26.38 रुपये झाला आहे. अशाप्रकारे या शेअरने अवघ्या एका महिन्यात 128.00 टक्के परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

Northern Spiritsचा शेअर आजपासून महिन्यापूर्वी 241.40 रुपयांवर व्यवहार करत होता. मात्र, आता या शेअरचा दर 521.35 रुपये झाला आहे. अशाप्रकारे या शेअरने अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 115.97 टक्के परतावा दिला आहे.

Kiran Syntex Ltdचा शेअर आजपासून महिनाभरापूर्वी 6.48 रुपयांवर व्यवहार करत होता. मात्र आता या शेअरचा दर 13.92 रुपये झाला आहे. अशाप्रकारे या शेअरने अवघ्या एका महिन्यातच 114.81 टक्के परतावा दिला आहे.

Popular Estate Managचा शेअर आजपासून महिनाभरापूर्वी 13.89 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. मात्र, आता या शेअरचा दर 28.27 रुपये झाला आहे. अशाप्रकारे या शेअरने अवघ्या एका महिन्यात 103.53 टक्के परतावा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe